[ad_1]
वेस्टर्नबरोबरच पारंपरिक पोषाखामध्ये देखील करिना अगदी खुलून दिसते. काही कार्यक्रमांमध्ये देखील पारंपरिक पोषाख परिधान करण्याकडे तिचा अधिक कल असतो. आजवर तिला वेगवेगळ्या लुकमध्ये आपण पाहिलं आहे. परफेक्ट ड्रेसिंग स्टाइलमुळे टॉप स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्ये करिनाचा पहिला नंबर लागतो. आता हेच बघा ना किंग खान शाहरुख खानच्या एका पार्टीमध्ये चंदेरी दुनियेतील टॉपच्या अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती अभिनेत्री करिना कपूर खानची. तिचा या पार्टीमधील लुक कसा होता यावर एक नजर टाकुया.
पार्टीमध्ये करिनाचीच चर्चा
बॉलिवूड पार्ट्यांमधील सेलिब्रिटींचे लुक, त्यांचे महागडे कपडे, दागिने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. २०१८मध्ये अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानने मुंबईतील राहत्या घरी एका दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला श्रद्धा कपूर, आलिया भट, मलायका अरोरा सारख्या अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. मात्र करिनाचा लुक या पार्टीमध्ये सगळ्याच अभिनेत्रींवर भारी पडला. करिनाने या पार्टीमध्ये काळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. या लेहंग्याला ग्लॅमरस तसेच पारंपरिक टच देण्यात आला होता.
(पतीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात नटून थटून पोहोचली मीरा राजपूत, बोल्ड ब्लाउज लुकमुळे होती चर्चेत)
आकर्षक लेहंगा
करिनाने या पार्टीसाठी ड्यूअल कलर कॉम्बिनेशनच्या लेहंग्याची निवड केली होती. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अनामिका खन्ना हिने हा लेहंगा डिझाइन केला होता. हा लेहंगा म्हणजे एका प्रकारचा थ्री पीस सेपरेट्स सेटच होता. ग्लॅमरस, डिप नेक ब्लाउज, डिझायनर स्कर्ट आणि त्यावर कॉन्ट्रास्ट ओढणी करिनाने घेतली होती. हा लेहंगा तयार करण्यासाठी सिल्क क्रेप आणि ऑर्गेंजा सारखं मिक्स फॅब्रिक वापरण्यात आलं होतं. तसेच संपूर्ण लेहंग्याला हॅण्ड वर्क करण्यात आलं होतं. करिनाचा हा लेहंगा अगदी लाइटवेट होता. तसेच यासाठी नॉन स्ट्रेचेबल पॅटर्न वापरण्याकडे डिझायनरने अधिक प्राधान्य दिलं होतं.
(करीना कपूरच्या लग्नात करिश्माने परिधान केला होता सुंदर ड्रेस, मोहक लुक पाहून चाहते झाले फिदा)
पारंपरिक लेहंग्याची खासियत
करिनाच्या या आकर्षक लेहंग्याला पारंपरिक टच देण्यात आला होता. या लेहंग्यावर हेवी एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. लेहंग्यावर बारीक नक्षीदार काम करण्यात आलं होतं. त्याचबरोबरीने लेहंग्याच्या वेस्टलाइनला मॉडर्न टच देखील देण्यात आला होता. तसेच लेहंग्यावर करण्यात आलेलं बारीक भरतकाम सोन्याच्या तारांमुळे अधिक आकर्षक आणि सुंदर दिसत होतं. लेहंगा किंवा साडीवर भारी एम्ब्रॉयडरी असेल तरच आपण अगदी खुलून दिसतो असं बऱ्याच लोकांच म्हणणं असतं. मात्र नक्षीदार आणि साध्या एम्ब्रॉयडरीमुळे देखील लेहंगा किंवा साडीला एक वेगळा लुक आपण देऊ शकतो.
(अभिनेत्रीचा छोट्या ड्रेसमधील बोल्ड लुक व्हायरल, हॉट अवतार पाहून कोणीही होईल फिदा)
या गोष्टींकडे दिलं विशेष लक्ष
या लेहंग्याबरोबर करिनाने हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाउज परिधान करणं पसंत केलं होतं. तसेच ऑर्गेंजा फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेली पांढऱ्या रंगाची ओढणी विशेष लक्ष वेधून घेणारी होती. बस्टियर पॅटर्नचा ब्लाउज आणि संपूर्ण लेहंग्यामधील करिनाचा लुक पाहून उपस्थितांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. या लेहंग्याला परफेक्ट टच देण्यासाठी सोनेरी तारांचा वापर करण्यात आला होता. तसेच या पारंपरिक लुकला मॉडर्न टच कसा देता येईल याकडे विशेष लक्ष देण्यात आलं होतं.
(मलायका अरोरानं मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी घातला बोल्ड ड्रेस, सर्वजण तिलाच पाहत राहिले एकटक)
असा होता मेकअप
करिनाला फॅशनच्याबाबतीत सारं काही परफेक्ट लागतं. प्रत्येक आउटफिटवरील तिचा मेकअप देखील अगदी पाहण्यासारखा असतो. या पार्टीमध्ये देखील तिने आपल्या आउटफिटला शोभेल असाच मेकअप करणं पसंत केलं होतं. सेमी-स्मूद आयलायनर, स्मोकी आइज, लाइड शेड लिपस्टिक, हायलायटर असा करिनाचा मेकअप होता. तसेच साइड पार्टेट हेअरस्टाइलमध्ये तर करिना कमालीची दिसत होती. त्याचबरोबरीने गळ्यात नेकपीस न घालता करिनाने मोठे कानातले घालणं पसंत केलं होतं. तुम्ही देखील एखाद्या विवाहसोहळ्यासाठी करिनाचा हा लुक फॉलो करू शकता.
(अजय देवगणच्या लेकीनं हॉट शॉर्ट्स घालून मलायकाला दिली तगडी स्पर्धा, फिटनेसचंही लोकांनी केलं कौतुक)
[ad_2]
Source link