Home मनोरंजन अंकिता लोखंडेचा पातळ कापडाच्या कुर्त्यामधील सुंदर व मोहक लुक, आईसोबत दिसली स्टायलिश अवतारात

अंकिता लोखंडेचा पातळ कापडाच्या कुर्त्यामधील सुंदर व मोहक लुक, आईसोबत दिसली स्टायलिश अवतारात

0
अंकिता लोखंडेचा पातळ कापडाच्या कुर्त्यामधील सुंदर व मोहक लुक, आईसोबत दिसली स्टायलिश अवतारात
बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande Traditional Look) आपल्या स्टायलिश अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. ही अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे एकापेक्षा एक सुंदर अवतारातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. वेस्टर्न कपड्यांपासून ते पारंपरिक पोषाखापर्यंत, अंकिता सर्वच प्रकारच्या वेशभूषेमध्ये सुंदर दिसते. तिच्या वॉर्डरोबमध्येही आउटफिट्सचे शानदार कलेक्शन आहे. अंकिताचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यास तिचे वेगवेगळ्या स्टायलिश लुकमधील कित्येक फोटो तुम्हाला आढळतील.

पण चाहत्यांना अंकिताला पारंपरिक पेहरावामध्येच पाहणं जास्त पसंत आहे. साडी, ड्रेस, लेहंगा यासारख्या पोषाखामध्ये अंकिताचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. नुकतेचा तिचा आकर्षक व सुंदर लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. पाहुया फोटो…

​गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील मोहक लुक

अंकिता लोखंडेनं मुंबईमध्ये जुहू परिसरातील कमाल जैन यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळेस तिनं पारंपरिक पोषाख परिधान केल्याचं पाहायला मिळालं. पारंपरिक कपडे परिधान करणं अंकिता प्रचंड आवडते, हे तिच्या चाहत्यांना चांगलंच ठाऊक आहे. दरम्यान कामानिमित्त झालेल्या या भेटीसाठी तिनं गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस घातल्याचे आपण या फोटोमध्ये पाहू शकता. अभिनेत्रीवर हा रंग अतिशय खुलून दिसत आहे.

​कुर्त्याचं फॅब्रिक होतं अतिशय नाजूक

अंकिता लोखंडेनं परिधान केलेला कुर्ता शिफॉन अथवा जॉर्जेट फॅब्रिकपासून तयार करण्यात आल्याचे दिसत आहे. हे कापड अतिशय नाजूक असते. तसंच अशा प्रकारचे कापड पातळ असल्यानं पेहराव शिवताना त्यामध्ये अस्तर वापरण्याची आवश्यकता भासतेच. अंकितानं परिधान केलेला कुर्ता सुद्धा याच पॅटर्नमधील असल्याचे आपण पाहू शकता. कुर्त्याच्या हाताच्या भागावर अस्तर जोडण्यात आले नव्हते. पण आकर्षक लुक मिळावा यासाठी मनगटावर गडद मरून रंगाची बॉर्डर जोडण्यात आली आहे.

​कुर्त्यावरील बांधणी प्रिंट

अंकिताने परिधान केलेल्या कुर्त्यावर सुंदर बांधणी प्रिंट आपण पाहू शकता. यामध्ये पांढरा, निळा आणि करड्या रंगाचा समावेश आहे. या रंगसंगतीमुळे अभिनेत्रीचा कुर्ता अतिशय आकर्षक दिसतोय. मुख्यतः गुजरात, राजस्थान, पंजाब यासारख्या भागांमध्ये बांधणी प्रिंटच्या पोषाखांचा ट्रेंड जास्त प्रमाणात पाहायला मिळतो.

​ड्रेसमधील हॉट नेकलाइन डिझाइन

कुर्त्याचं पॅटर्न रॅप अराउंड डिझाइनमधील होते. ड्रेसच्या कमरेच्या भागावरही स्टायलिश डिझाइन जोडण्यात आलं होतं. यावरील लाल रंगाचे टॅसल्स सुद्धा प्रचंड सुंदर व आकर्षक दिसताहेत. कुर्त्यामध्ये डीप व्ही नेकलाइन डिझाइन देण्यात आलं होतं. यामुळे अंकिताला बोल्ड लुक मिळाला होता. दरम्यान अंकिताने गुलाबी रंगाच्या कुर्त्यावर पांढऱ्या रंगाची पलाझो परिधान केली होती.

​अंकिताच्या आईचा कुर्ता व पलाझो लुक

अंकिताप्रमाणेच तिच्या आईनंही कुर्ता आणि पलाझो असा पोषाख परिधान केला होता. त्यांनी क्रीम आणि लाल रंगाचा स्ट्रेट कट कुर्ता घातला होता. पोषाखावर लाल रंगाचे प्रिंट आपण पाहू शकता. कुर्त्यावर त्यांनी लाल रंगाची पलझो मॅच केली होती. तर दुसरीकडे त्यांनी हातामध्ये त्यांनी गुलाबी व जांभळ्या रंगाची पर्स सुद्धा कॅरी केली होती. अंकिता व तिच्या आईने काळ्या रंगाचा गॉगलही मॅच केली होता, यामुळे दोघींना कूल लुक मिळालाय. मायलेकीची ही जोडी प्रचंड स्टायलिश दिसत होती.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here