नवी दिल्ली : टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे.या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. त्यामुळे या खेळाडूंना खुल्या मनानं पाठिंबा द्या असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्याच्या प्रवीण जाधव या खेळाडूचे ऑलिंपिक निवडीबद्दल कौतुक केलं.
‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी मिल्का सिंग यांचं स्मरण केलं. तसेच टोकियो ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा संघर्ष कठोर आहे असं सांगत त्यांनी ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधांनांनी शुभेच्छा दिल्या.