Home देश-विदेश ओवैसींचा एआयएमआयएम पक्ष उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढवणार

ओवैसींचा एआयएमआयएम पक्ष उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढवणार

0

लखनौ : उत्तर प्रदेशात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बसपाशी युती करण्याच्या बातम्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “आम्ही ओम प्रकाश राजभर साहेब’ याच्या भागीदारी संकल्प मोर्चा’ सोबत आहोत, आम्ही निवडणुका किंवा युतीसंबंधात इतर कोणत्याही पक्षाशी बोललो नाही.”

100 जागांवर उमेदवार उभे करणार
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, “मला उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात काही गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या आहेत, आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही 100 जागांवर आपले उमेदवार उभे करू, पक्षाने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली असून आम्ही उमेदवारांसाठी अर्ज जारी केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे शनिवारी असे वृत्त होते की उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी युती करेल. मात्र, बसपाच्या सुप्रीमोने ट्विटद्वारे या बातम्यांना फेटाळून लावले आहे. आता असदुद्दीन ओवेसी यांनीही अशा बातम्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी युती करणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट करत या चर्चांना खोटं सांगितलं आहे. आपल्या ट्विटमध्ये बसपच्या सुप्रीमोने म्हटले आहे की, ही दिशाभूल करणारी आणि तथ्य नसलेली बातमी आहे, यात काहीही सत्य नाही.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here