Home क्रीडा एक अर्धशतकाचा मिताली राजला फायदा, ICC Women ODI Rankings मध्ये घेतली झेप, पोहोचली ‘या’ स्थानावर | Indian Women Cricketer Mithali Raj Reached on 5th position in ICC Women ODI Rankings after hitting half century against England

एक अर्धशतकाचा मिताली राजला फायदा, ICC Women ODI Rankings मध्ये घेतली झेप, पोहोचली ‘या’ स्थानावर | Indian Women Cricketer Mithali Raj Reached on 5th position in ICC Women ODI Rankings after hitting half century against England

0

[ad_1]


भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने आयसीसी महिला क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 वर्षे पूर्ण केलेल्या मितालीने आणखी एक यश संपादीत केले आहे.

एक अर्धशतकाचा मिताली राजला फायदा, ICC Women ODI Rankings मध्ये घेतली झेप, पोहोचली 'या' स्थानावर

मिताली राज

ब्रिस्टॉल : भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजकडे (Mithali Raj) महिला क्रिकेट जगतातील एक दिग्गज खेळाडू म्हणून पाहिलं जात. भारताकडून सर्वाधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या मितालीने काही दिवसांपूर्वीच महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या पंगतीत स्थान मिळवलं. सचिन 22 वर्षे 91 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता तर मितालीने 26 जून, 2021 रोजी 22 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानंतर लगेगच मितालीने आणखी एक यश मिळवले असून नुकतीच इंग्लंड विरोधातील एकदिवसीय सामन्यात 72 धावांची खेळी करत मितालीने आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत (ICC Women ODI Batter Rankings) कमालीची झेप घेतली आहे.

भारतीय महिला सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. एक कसोटी, तीन वन-डे आणि तीन टी-20 सामने या दौऱ्यात खेळवले जाणार आहेत. यातील पहिली कसोटी ड्रॉ झाल्यानंतर पहिल्या वन डे मध्ये भारतीय संघ 8 विकेट्सने पराभूत झाला. पराभवानंतर देखील एकाकी झुंज देणाऱ्या मितालीला तिच्या 72 धावांच्या अर्धशतकी खेळीचा फायदा झाला. ज्यामुळे महिला फलंदाजाच्या क्रमवारीत 3 स्थांनानी वर जात पाचव्या स्थानी विराजमान झाली आहे.

सचिनच्या पंगतीत मिळवलं स्थान

मिताली राजने 26 जून, 1999 रोजी आयर्लंड विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर सातत्याने भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या मितालीने काही दिवसांपूर्वीच म्हणजे 26 जून, 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची 22 वर्षे पूर्ण केली. इतक्या दिर्घकाळ खेळणारा दुसरा भारतीय खेळाडू म्हणजे महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar). सचिन 22 वर्षे 91 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असून मितालीने 22 वर्षे पूर्ण केली असून ती अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. मितालीने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. तिने 77 अर्धशतकांसह 8 शतकही ठोकली आहेत.

हे ही वाचा –

Photo : मिताली राजने रचला इतिहास, सचिन तेंडुलकरच्या पंगतीत मिळवलं स्थान, अशी कामगिरी करणारी पहिलीच महिला

ICC Cricket T20 World Cup 2021 Schedule : टी 20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर, फायनल कधी?

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

(Indian Women Cricketer Mithali Raj Reached on 5th position in ICC Women ODI Rankings after hitting half century against England)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here