[ad_1]
खेल रत्न पुरस्कारासह अर्जुन पुरस्कारासाठीही तिघा युवा क्रिकेटपटूंची नावे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात आली आहेत.
मिताली राज
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देशातील खेळाडूंसाठी सर्वांत मानाचा पुरस्कारांपैकी एक असणाऱ्या खेल रत्न पुरस्कारासाठी (Khel Ratna Award) भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजसह फिरकीपटू आर. आश्विनच्या नावाची शिफारस केली आहे. यासोबतच अर्जुन पुरस्कारासाठीही (Arjun Award) तिघा युवा क्रिकेटपटूंची नावे बीसीसीआयने सूचवली आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), के एल राहुल ( Kl Rahul) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्या नावांचा समावेश आहे.29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय खेल दिवसाचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. (BCCI Nominates Mithali raj and R Ashwin for Khel Ratna Award And Jasprit Bumrah Shikhar Dhawan Kl Rahul name Given For Arjun Award)
देशांसाठी क्रिडा क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सम्मान करण्यासाठी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारासारखे पुरस्कार दिले जातात. त्यासाठी ठरावीक वेळे केलेल्या अप्रतिम कामगिरीवर क्रिडापटूंची निवड केली आहे. दरम्यान बीसीसीआयने यंदाच्या पुरस्कारांसाठी 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान अप्रतिम कामगिरी केलेल्या खेळाडूंची नावे पुरस्कारासाठी सूचविली आहेत. ANI या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली.
BCCI recommends Mithali Raj and Ashwin’s name for Khel Ratna Award
Read @ANI Story | https://t.co/FvY4y57a7c pic.twitter.com/3i2vQgH2TV
— ANI Digital (@ani_digital) June 30, 2021
मिताली राज आणि आर. आश्विनची धाकड कामगिरी
महिला क्रिकेटपटू मिताली राजने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 22 वर्षे पूर्ण केली. सचिन तेंडुलकरनंतर इतका काळ खेळलेली ती दुसरी भारतीय क्रिकेटपटू आहे. तसेच महिलांच्या एकदिवसीय सामन्यांतही सर्वाधिक धावा मितालीच्याच नावावर आहेत. तर दुसरीकडे आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये मागील बऱ्याच वर्षांपासून भारतीय गोलंदाजीची मदार पेलली आहे. त्याने नुकत्याच 400 विकेट्सा टप्पाही पार केला. तसेच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 71 विकेट्स घेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही ठरला. तसेच बुमराह, धवन आणि राहुल यांचीही मागील काही वर्षातील कामगिरी उल्लेखणीय असल्याने अर्जुन पुरस्कारासाठी त्यांची शिफारस करण्यात आली आहे.
या खेळाडूंनाही नामांकन
[ad_2]
Source link