[ad_1]
हायलाइट्स:
- किसान सभेचा महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप
- केंद्राचे कृषी कायदे मागल्या दारानं राज्यावर लादण्याचा डाव
- किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी दिला आंदोलनाचा इशारा
वाचा: ‘वडेट्टीवार, भुजबळ खोटारडे; कोर्टाने ती माहिती मागितलीच नव्हती’
‘केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या शेतकरी संघटनांचा संघर्ष अद्याप सुरू आहे. आंदोलन अधिक व्यापक करत कायदे संपूर्णपणे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनांनी देशव्यापी अभियान सुरू केले आहे. कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहता सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. राज्यामध्ये सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध केलेला आहे. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला सुद्धा या पक्षांनी वेळोवेळी पाठिंबा व्यक्त केलेला आहे. एकीकडे वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र मागच्या दाराने या कायद्यांमधील बहुतांश तरतुदी नव्या कायद्याच्या रूपाने महाराष्ट्रात लागू करायच्या, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे हे वर्तन अत्यंत निषेधार्ह आणि संशयास्पद आहे,’ असा संताप नवले यांनी व्यक्त केला आहे.
वाचा: रेशन कार्डवरील ‘महाराष्ट्र शासन’ हा शब्द जाणार?; मनसेच्या नेत्याला शंका
‘आंदोलन अद्याप संपलेले नसताना व सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठलेली नसताना, महाराष्ट्र सरकार वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांमधील तरतुदी महाराष्ट्रात लागू करण्याची घाई का करत आहे? राज्य सरकारने सुरू केलेली संशयास्पद घाईगर्दी तातडीने थांबवावी. नक्की कोणते बदल सरकार करू पाहते आहे याबद्दलचा मसुदा चर्चेसाठी पब्लिक डोमेनमध्ये प्रसिद्ध करावा. सर्व शेतकरी संघटना व शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये विश्वासात घ्यावे. सर्व स्तरावर व्यापक चर्चा घडवून आणावी. त्यानंतरच निर्णय घेण्यात यावा. शेतकरी संघटनांना व किसान सभेला विश्वासात न घेता हे कायदे राज्यात लागू करण्याचा प्रयत्न झाला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू,’ असा इशाराही देण्यात आला आहे.
वाचा: फडणवीसांच्या तीन मागण्यांवर कार्यवाही करा; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
[ad_2]
Source link