[ad_1]
भारताची बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमसह आघाडीच्या बॉक्सर्सनी टोक्यो ऑलम्पिकसाठी कंबर कसली आहे. सर्वांनी सरावासाठी कसून सुरुवात केली आहे.
1/5
टोक्यो ऑलम्पिक 2021 (Tokyo Olympics 2021) खेळण्यासाठी भारतीय बॉक्सर सज्ज झाले आहेत. आतापर्यंत भारताकडून ऑलम्पिकमध्ये मेरी कॉम (2012) आणि विजेंदर सिंह (2008) या दोघांनीच कांस्य पदक मिळवले आहे. मात्र यंदा 13 भारतीय बॉक्सर ऑलम्पिक खेळण्यासाठी जाणार असल्याने भारतीयंना बॉक्सर्सकडून मेडल मिळवण्याची अधिक अपेक्षा आहे.
2/5
तब्बल सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली भारतीय बॉक्सर मेरी कॉमवर (Mary Kom) सर्वाधिक अपेक्षा आहेत. 2012 च्या लंडन ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक विजेती मेरी 2016 च्या रिओ ऑलम्पिकमध्ये हिस्सा घेऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा मेरी पदक पटकावेल अशी आशा सर्व भारतीय करत आहेत.
3/5
भारतीय बॉक्सिंगपटू अमित पंघालही (Amit Panghal) टोक्यो ऑलम्पिकमध्ये भाग घेत आहे. अमित सध्या त्याच्या गटात जागतिक क्रमवारीत अव्वल आहे. त्यामुळे अमितकडून भारताला सुवर्णपदकाची आशा आहे. दुबईत झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अमितने रौप्य पदक पटकावलं होतं. तसेच 2019 मध्ये बँकॉंक आशियाई चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक पटकावलेल्या अमितकडून ऑलम्पिकमध्ये सर्वांनाच आशा आहेत.
4/5
मेरी कॉमनंतर भारताची आणखी एक महिला बॉक्सर जिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे ती म्हणजे पूजा रानी (Pooja Rani). तिचे मागील काही स्पर्धांमधील प्रदर्शन पाहता तिला पदकाची प्रबळ दावेदार समजलं जात आहे. पूजाने नुकत्याच पार पडलेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.
5/5
भारतीय बॉक्सिंगपटू मनीष कौशिक (Manish Kaushik) हा देखील टोक्यो ऑलम्पिक पात्र झाला आहे. मनीषने 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवले होते. 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्याने रौप्य पदक मिळवले होते. त्यामुळे टोक्यो ऑलम्पिकमध्येही तो पदक पटकावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
[ad_2]
Source link