[ad_1]
हायलाइट्स:
- शिवसेनेच्या महापौर महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन दाम्पत्याने आज बुधवारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली.
- खडसेंसोबत अर्धातास बंदद्वार चर्चा झाल्याने शिवसेनेत अस्वस्थता.
- या भेटीत जळगाव शहराचा विकासाबाबत तसेच भाजपातून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत चर्चा- खडसेंचा खुलासा.
जळगाव जिल्ह्यातील व शहरातील शिवसेना गोटात गेल्या काही दिवसांपासून धुसफुस सुरु असतांनाच शिवसेनेच्या महापौर महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन दाम्पत्याने आज बुधवारी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची जळगावातील निवासस्थानी जावून भेट घेतली. यावेळी महापौर व विरोधी पक्षनेत्यांनी खडसेंसोबत अर्धातास बंदद्वार चर्चा झाल्याने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान या भेटीत जळगाव शहराचा विकासाबाबत तसेच भाजपातून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहीती एकनाथ खडसे यांन पत्रकारांशी बोलतांना दिली. सुनील महाजन यांनी, महाविकास आघाडीचे एकनाथ खडसे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत. तसेच मनपातील सत्तांतरात देखील त्यांचा मोठे श्रेय होते, यामुळेच ही भेट घेतली असल्याचे सांगितले. (shiv sena jalgaon mayor jayshree mahajan and opposition leader sunil mahajan meet eknath khadse)
जळगाव शहर महापालिकेच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय कुरघोडींना वेग आला आहे. महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातून २७ नगरसेवक फुटून शिवसेनेच्या गोटात दाखल झालेत. या बंडखोर नगरसेवकांची मोट बांधून शिवसेनेने आपला महापौर जळगाव निवडून आणून महापालिकेवर सत्ता काबीज केली. मात्र, त्यानंतर शिवसेनेत निष्ठावंत नगरसेवक व नविन आलेले बंडखोर नगरसेवक यांच्यात धुसफुस सुरु आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेत झालेल्या फेरबदलांमधील नविन नियुक्त्यांमुळे देखील शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली होती.
क्लिक करा आणि वाचा- पुणे ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका; ‘त्या’ २३ गावांचा महापालिकेत समावेश
या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन व त्यांचे पती व विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची त्यांच्या निवास्थानी जावून घेतलेली भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. भेटीदरम्यान महाजन दाम्पत्याने खडसे यांच्यासोबत अर्धातास बंदद्वार चर्चा देखील केली. यावेळी यावेळी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील व माजी उपमहापौर सुनील खडके हे देखील उपस्थित होते.
हुडकोच्या कर्जफेडीवर चर्चा
या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खडसे यांनी ही भेट मनपावर असलेले हुडकोचे कर्ज शासनाने फेडले. मात्र, राज्य शासनाचे कर्ज कायम आहे. ते कर्ज फेडण्याबाबत महापौरांनी विनंती केली आहे. याबाबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्याबाबतचे निवेदन दिले होते. याबाबतच या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती खडसेंनी दिली. तसेच भाजपाकडून आमदार गिरीष महाजन यांनी जळगाव महापालिका कर्जमुक्त झाल्याची घोषणा फसवी असल्याचेही खडसे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- मी मंत्रिपदाची मागणी केलेली नाही; नाना पटोले यांचे स्पष्टीकरण
भाजपचे काही नगरसेवक संपर्कात
भाजपमधून फुटून आलेला कोणताही नगरसेवक परत भाजपमध्ये जाणार नाहीत. उलट भाजपचे ८ ते १० नगरसेवक आमच्या संपर्कात आले आहेत. लवकरच त्यांचा प्रवेश होईल असे खडसे यांनी सांगीतले. मात्र, हा प्रवेश शिवसेनेत की राष्ट्रवादीत हे मात्र खडसे यांनी स्पष्ट केले नाही.
क्लिक करा आणि वाचा- आता मुस्लिम आरक्षणाची लढाई; वंचित बहुजन आघाडीचा ५ जुलैला विधानभवनवर मोर्चा
बीएचआरच्या कर्जदारांमध्ये पुढारी देखील-खडसे
बीएचआर प्रकरणात फार मोठा घोटाळा आहे. मागच्या सरकारमधले काही लोक यात गुंतले असल्याने चौकशी झाली नव्हती. आता या चौकशीला वेग आला आहे. कंडारेच्या जबाबानतंर आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली. अनेकांनी बेकायदेशीर कर्ज घेतले आहे. यातील मोठ्या कर्जदारांना सामोरे जावे लागेल.सरकारला विनंती करणार की, जे ६५० मोठे कर्जदार आहेत. त्यांच्याकडून कर्ज भरुन घ्यावे म्हणजे ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळतील यासाठी माझा आग्रह आहे. काही राजकीय व्यक्तींनी देखील कर्ज घेतले आहे. त्यांनी कर्ज फेडावे म्हणजे कारवाई होणार नाही, असेही खडसे यांनी सांगीतले. अनिल देशमुख यांच्या इडी चौकशीबाबत माझीच चौकशी सुरु असल्याने बोलता येणार नाही,असेही खडसे म्हणाले.
[ad_2]
Source link