[ad_1]
हायलाइट्स:
- पुण्यातील वानवडी आझाद नगर परिसरात खळबळ
- नवविवाहित डॉक्टर दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या
- डॉक्टर्स दिनीच घटना घडल्यानं सर्वत्र हळहळ
गुलशन कुमार हत्याकांड: मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
अंकिता आणि निखिल हे दोघेही आझाद नगर इथं राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. अंकिता यांची क्लिनिक आझाद नगर येथील गल्ली नंबर २ या ठिकाणी आहे. तर, निखिल अन्य ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. काल रात्री घरी परतत असताना दोघांमध्ये फोनवर शाब्दिक वाद झाला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास निखिल घरी पोहोचले तेव्हा अंकिता घरातील बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्या. डॉक्टर अंकिता यांनी गळफास घेतल्याची माहिती वानवडी पोलिसांना (Wanwadi Police) देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर अंकिता यांचा मृतदेह त्यांच्या ऊरुळीकांचन येथील माहेरी नेण्यात आला. पत्नीनं आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्यानं डॉ. निखिल यांनी बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरामध्ये पंख्याला गळफास लावून घेतला.
वाचा: ‘वंचितांचे प्रतिनिधी ५० लाखांच्या गाड्या घेऊन फिरत नाहीत; राष्ट्रवादीचा पडळकरांना टोला’
याची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी धाव घेतली. डॉक्टर निखिल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या दोघांनी आत्महत्या का केली हे समजू शकलं नाही. मात्र, या दोघांमध्ये क्षुल्लक कारणवारून सतत वाद होत असल्यानं दोघेही मानसिक त्रासात होते. त्या त्रासातून सुटका व्हावी म्हणूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला असून वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
[ad_2]
Source link