[ad_1]
नवी दिल्ली: यूरोपमधील (EU)नऊ देशांनी कोविशील्ड लस (Covishield ) घेतलेल्या लोकांना आपल्या देशात प्रवासासाठी परवानगी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोवेनिया, यूनान, आइसलँड, आयरलँड आणि स्पेननं कोविशील्ड लस घेतलेल्या भारतीय लोकांना आपल्या देशात येण्याची परवानगी दिली आहे. स्वित्झरलँडनं देखील कोविशील्ड लस घेणाऱ्यांना देशात प्रवासाची परवानगी दिली आहे तर एस्टोनिया या देशानं भारतीयांना तिथं येण्यासाठी भारत सरकार द्वारे अधिकृत केलेल्या कुठल्याही लस घेतलेल्या लोकांना परवानगी दिली आहे.
याआधी भारतानं युरोपीय संघाचे सदस्य असलेल्या देशांना म्हटलं होतं की, कोविशील्ड आणि कोवॅक्सीन लस घेतलेल्या भारतीयांना यूरोप प्रवासाची परवानगी द्यावी. यूरोपीय संघाच्या डिजिटल कोविड प्रमाणपत्र रूपरेषा ‘ग्रीन पास’ गुरुवारपासून सुरु होणार आहे. त्या अंतर्गत कोविड-19 महामारी दरम्यान कोविशील्ड घेतलेल्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
युरोपियन युनियनमधील भारताच्या डिप्लोमसीला यश, 8 देशांकडून कोविशील्डला हिरवा कंदील
या ग्रीन पास अंतर्गत युरोपीय देशांमध्ये त्याच लोकांना प्रवासाची परवानगी असेल ज्यांनी युरोपीय मेडिकल एजन्सी (ईएमए) द्वारे अधिकृत केलेल्या लसी घेतल्या असतील. यामुळं भारतीयांना अशी शंका होती की, कोविशील्ड आणि कोवॅक्सीन घेतलेल्या लोकांना यूरोपीय संघातील देशांमधील ‘ग्रीन पास’ योजनेअंतर्गत प्रवासासाठी पात्र आहेत की नाहीत.
एका युरोपीय अधिकाऱ्यानं सांगितलं की, यूरोपीय संघाच्या सदस्य देशांकडे कोविशील्ड सारख्या जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यता प्राप्त लसीचा स्वीकार करण्याला आणि डिजिटल कोविड प्रमाणपत्र घेण्याचा पर्याय असेल.
परदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरदार, खेळाडू यांना कोविशिल्डचा दुसरा डोस 28 दिवसांनी घेता येणार
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी युरोपीय संघांच्या उच्च प्रतिनिधी जोसफ बोरेल फोंटेलेस यांच्यासोबत बैठकी दरम्यान कोविशील्ड लसीचा ईयूच्या डिजिटल कोविड प्रमाणपत्र योजनेत सहभागी करुन घेण्याची मागणी केली होती. भारताच्या या मागणीवर सकारात्मक विचार झाला असून आता युरोपीय संघातील ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोवेनिया, यूनान, आइसलँड, आयरलँड, स्पेन, स्वित्झरलँड, एस्टोनिया या देशांमध्ये कोविशील्ड घेतलेल्या भारतीयांना प्रवासासाठी परवानगी मिळाल्याची माहिती आहे.
[ad_2]
Source link