[ad_1]
प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने आपल्या घरी लंच आणि डिनर पार्टी आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये कपूर घराण्यातील महिला सदस्य देखील सहभागी झाल्या होत्या, ज्यांचे डिझाइनरसोबत अतिशय जवळचे नाते आहे. दरम्यान यावेळेस हटके आणि स्टायलिश लुक कॅरी करण्याच्या स्पर्धेत लोलो आणि बेबोवर कपूर कुटुंबातील दुसरी लाडकी लेक भारी पडल्याचं पाहायला मिळालं. (फोटो सौजन्य : योगेन शाह)
(अॅनिमल प्रिंट बिकिनीमधील बॉलिवूड अभिनेत्रींचा हॉट व बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते झाले फिदा)
मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचला मित्र-परिवार
फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राला आपल्या घरी मित्र-मैत्रिणींना बोलावणं, त्यांना पार्टी देणे भरपूर पसंत आहे. अशाच एका गेट- टुगेदर पार्टीचं आयोजन त्यानं आपल्या मुंबईतील घरामध्ये केलं होतं. लंच पार्टीमध्ये करीना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा या तारका सहभागी झाल्या होत्या. या अभिनेत्रींचा स्टायलिश लुक यावेळेस पाहायला मिळाला.
(आकाश अंबानीच्या पार्टीत या सौंदर्यवतीमुळे शाहरुखचा जीव झाला येडापिसा, तिच्याकडेच पाहत होता एकटक)
करीनाने परिधान केला फिगर-हगिंग ड्रेस
करीनाच्या लुकबाबत सांगायचे झाले तर या अभिनेत्रीनं आपली फिगर शेपमध्ये येताच फ्लॉन्ट करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. या पार्टीसाठी तिनं काळ्या रंगाचं बॉडी-हगिंग मिडी आउटफिट परिधान केलं होतं. ड्रेसमध्ये वाइड स्ट्रॅप्स आणि राउंड नेकलाइन डिझाइन आपण पाहू शकता. परफेक्ट स्टायलिश लुक मिळावा यासाठी अभिनेत्रीनं फुटवेअर्समध्ये लेपर्ड प्रिंटचे ‘Christian Louboutin’ पीप-टो हील्सची निवड केली होती.
(सोनम कपूरच्या मेंदी सोहळ्यात करिश्माने घातला होता सुंदर लेहंगा, मोहक सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ)
आठ लाख रूपयांची बॅग केली कॅरी
करीनाच्या या लुकमध्ये केवळ हील्सच लग्जरी लेबलचे नव्हते तर तिच्या हातामध्ये दिसणारी बॅग सुद्धा प्रसिद्ध फॅशन ब्रँडची असल्याची माहिती आहे. अभिनेत्रीनं कॅरेमल ब्राउन कलरची ‘Hermès Birkin’ टोट बॅग कॅरी केली होती. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार, या लेदर मेड हँडबॅगची किंमत जवळपास आठ लाख रूपये एवढी आहे. तसंच तिनं घातलेले फेस मास्क देखील ‘Louis Vuitton’ या फ्रेंच फॅशन लेबलचे होतं.
(आलिया भटने बहिणीच्या लग्नात घातला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, सर्वजण तिलाच पाहत होते एकटक)
करिश्माचा क्युट आणि स्टायलिश लुक
लंच पार्टीमध्ये करिश्मा कपूरचा हटके व क्युट लुक पाहायला मिळाला. पार्टीसाठी करिनाने ब्रिजी आउटफिटची निवड केली होती. या प्रिंटेड मिडी ड्रेसमध्ये ड्रॉ-स्ट्रिंग डिझाइन आपण पाहू शकता. ज्यामुळे अभिनेत्रीची स्लिम फिगर हाइलाइट होण्यास मदत मिळतेय. या लुुकवर लोलोने काळ्या रंगाचे हील्स, हँडबॅग, स्मार्टवॉच आणि ब्रेसलेट अशी अॅक्सेसरीज मॅच केली होती.
(अभिनेत्री बोल्ड कपडे घालून पोहोचली मनीष मल्होत्राच्या घरी, स्टाइल पाहून कोणीही होईल फिदा)
… आणि मग पोहोचली कपूर कुटुंबातील ही व्यक्ती
मनीष मल्होत्राच्या डिनर पार्टीमध्ये नीतू कपूर आपली मुलगी रिद्धिमा कपूर साहनी आणि नात समारा साहनीसह पोहोचली होती. यादरम्यान नेहमी प्रमाणेच नीतू कपूर यांचा स्टायलिश व मोहक लुक पाहायला मिळाला. नीतू यांनी पांढऱ्या रंगाची ट्राउझर परिधान केली होती आणि त्यावर काळ्या रंगाचे फुल स्लीव्ह्ज व राउंड नेकलाइन डिझाइन असणारे टॉप घातलं होतं. या लुकवर नीतूने पीप-टो हील्स आणि एम्रल्ड ग्रीन लेदर मिनी बॅग मॅच केली होती. यामुळे त्यांना स्टायलिश लुक मिळाला होता.
(अभिनेत्री गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसतेय प्रचंड सुंदर, पतीसोबतचे रोमँटिक फोटो केले शेअर)
रिद्धिमाचा स्टायलिश अवतार
कपूर घराण्यातील लाडकी लेक रिद्धिमा कपूरने काळ्या रंगाचा जंपसूट परिधान केला होता. यामध्ये हायनेक, फुल स्लीव्ह्ज आणि स्ट्रेट-कट पँट डिझाइन आपण पाहू शकता. कमरेवर तिनं काळ्या रंगाचा बेल्ट सुद्धा लावला होता. या लुकवर तिनं बूट हील्स मॅच केले होते. रिद्धिमा या लुकमध्ये प्रचंड सुंदर दिसत होती. रिद्धिमाच्या लुकची लोलो आणि बेबोच्या लुकसह तुलना केल्यास, काही नवीन व हटके फॅशन ट्राय करण्याच्या स्पर्धेत रिद्धिमा कपूरने बाजी मारल्याचं स्पष्टपणे दिसतंय.
(मीरा राजपूत सैल कपडे घालून पोहोचली अंबानींच्या पार्टीमध्ये, सुंदर व मोहक लुकचं सर्वांनीच केलं कौतुक)
[ad_2]
Source link