पुणे, 02 जुलै: पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी त्यांनी पुण्यातील (Pune) निर्बंधावरील (Lockdown) माहिती दिली आहे. येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. (Pune Corona Virus)
पुण्याचा दर मागच्या तुलनेत वाढत असल्याचं म्हणत 4.6 पॉझिटिव्हिटी रेट होता आता 5.3 झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियमावली सुरू ठेवायचा निर्णय घेण्यात आला असल्याचं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
मॉल सुरू करावे का असा विचार होता. पण सेंट्रल एसीमुळे अधिकारी मॉल सुरु करण्यास नकार देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दुसऱ्या लाटेत लागलेल्या ऑक्सिजन पेक्षा तिप्पट ऑक्सिजन तयार करायची क्षमता तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये क्लासेस सुरू करणार पण विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्या दोन्ही लसीकरण केलेलं पाहिजे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.