[ad_1]
हायलाइट्स:
- कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप
- माजी खासदार किरीट सोमय्या यांचा रोहित पवारांवर आरोप
- रोहित पवार यांची चौकशी करण्याची सोमय्यांची मागणी
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावरील कारवाईचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर, त्यांनी रोहित पवार यांच्यावरही कारखाना लाटल्याचा आरोप केला आहे. कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री प्रक्रियेचीही ईडीनं चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीनं कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीत घोटाळा केला आहे. या कारखान्याची प्रत्यक्ष किंमत कितीतरी जास्त होती, मात्र रोहित पवारांनी घोटाळा करून हा कारखाना अवघ्या ५० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. पवार कुटुंबानं असे अनेक कारखाने लाटले आहेत. त्यामुळं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं मोठं नुकसान झालं आहे. या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
जरंडेश्वर साखर कारखाना जप्ती: अजित पवारांनी खोडून काढले सर्व आरोप
सक्तवसुली संचालनालयानं सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मालमत्ता सील केल्या आहेत. हा कारखाना अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांचा आहे. या कारखान्यानं राज्य सहकारी बँकेचं कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. त्याच अनुषंगानं ईडीनं कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना आधी सहकारी स्वरुपाचा होता. मात्र, नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं. हे प्रकरण पुढं आल्यानंतर आता भाजपनं पवार कुटुंबावर आरोप सुरू केले आहेत.
वाचा: सर्व काही नियमानुसारच! राज्यपालांच्या ‘त्या’ पत्राला मुख्यमंत्र्यांचं मुद्देसूद उत्तर
[ad_2]
Source link