Monsoon Update: राज्यात मान्सूनचा लंपडाव; विदर्भात नभ दाटले, पुण्यासह या जिल्ह्यांत पावसाची शक्यता

0
113

[ad_1]

पुणे, 02 जुलै: सध्या भारतात पावसाचा हंगाम (Monsoon season) आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला काही भागात मान्सूननं जोरदार हजेरी लावल्यानंतर आता मान्सूननं लंपडाव खेळायला सुरुवात केली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शांत झालेला पाऊस (Rain) अजूनही राज्यात अपेक्षेप्रमाणे कोसळला नाही. राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या (Farmers) पेरण्या राहिल्या आहेत. अशात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता वाढताना दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावत आहे.

मागील दोन आठवडे मान्सूननं ब्रेक घेतल्यानंतर जुलै महिन्यात मान्सूनची राज्यात वापसी (Monsoon Come back) होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली होती. सुरुवातीचे दोन झाले, तरीही मान्सूनचा काही थांगपत्ता नाहीये. पण आज विदर्भातील काही जिल्ह्यात नभ दाटून आले आहेत. तर पुण्यासह घाट परिसरातही ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

आज सकाळपासून पुणेसह सातारा आणि घाट परिसरात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी आज मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुणे आणि सातारा परिसरातही आज विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

उत्तरेत मान्सून रेंगाळला तापमानाची सरशी

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमान झाल्यानंतर पुढील दोन आठवड्यात मान्सून संपूर्ण देशाला व्यापण्याची शक्यता होती. पण उत्तरेकडे मान्सूननं प्रवास केल्यानंतर मान्सून रेंगाळला आहे. मान्सून रेंगाळताच उत्तर भारतात तापमानाचा पारा वाढला आहे. दिल्लीत काल 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. खरंतर, दरवर्षी जुलै महिन्यात दिल्लीतील तापमान 37-38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. पण मान्सून गायब झाल्यानं दिल्लीत सरासरीपेक्षा 7 अंश सेल्सिअस तापमान अधिक आहे.

Source link