Home महाराष्ट्र सर्वजण एकत्र आलो तर कोणत्याही संकटावर निश्चित मात करू; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास – cm uddhav thackeray says that if we all come together we will definitely overcome any crisis

सर्वजण एकत्र आलो तर कोणत्याही संकटावर निश्चित मात करू; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास – cm uddhav thackeray says that if we all come together we will definitely overcome any crisis

0
सर्वजण एकत्र आलो तर कोणत्याही संकटावर निश्चित मात करू; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास – cm uddhav thackeray says that if we all come together we will definitely overcome any crisis

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत ५ ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांचे लोकार्पण केले. करोनाच्या संकटावर मात करताना ऑक्सीजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. मुंबईत विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून पाच रुग्णालयांमध्ये उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण आज होत आहे. अशा पद्धतीने सर्वजण एकत्र आलो तर आपण कोणत्याही संकटावर निश्चित मात करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या लोकार्पणाच्या सोहळ्यात व्यक्त केला. (cm uddhav thackeray says that if we all come together we will definitely overcome any crisis)

मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल येथे ही पाच संयत्र उभारण्यात आली आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या संयंत्रांसाठी विशेष प्रयत्न केले होते.



मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई आणि लाटांचा कायमचा संबंध आहे. एक लाट गेली की दुसऱ्याची तयारी करावी लागते. कोरोना काळातही सर्वांनीच युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे काम केले. कोरोना काळात मुंबई मॉडेलचे जगभर कौतुक झाले. पण हे श्रेय माझे नसून प्रत्यक्ष काम करणाऱ्या आपल्या सर्वांचे आहे अशा शब्दात त्यांनी सर्व यंत्रणांचे कौतुक केले. मुंबईत अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारुन स्वयंपूर्णतेकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेची होत असलेली वाटचाल ही अभिमानास्पद आहे, असे कौतुकाचे उद्गार त्यांनी काढले.

ऑक्सिजन अभावी मुंबईतील सुमारे १५० रूग्णांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेतल्याने मोठा अनर्थ टळला होता. त्या सुमारास राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत होती. त्यामुळे ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने आज नवीन पाच संयंत्रे सुरू झाली आहेत, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी याबाबत पाठपुरावा करणारे मंत्री आदित्य ठाकरे, संबंधित सर्व यंत्रणांसह सीएसआर निधीतून मदत केलेल्या कंपन्यांचेही आभार मानले. कोणत्याही कामाचे श्रेय घेण्याऐवजी आपले काम बोलले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.



ऑक्सिजन व्यवस्थापनाचे यश

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी स्वतः कोविडग्रस्त असतानाची आठवण सांगताना ४ एप्रिल रोजी मुंबईत सुमारे ११ हजार रूग्ण होते, परंतु ऑक्सिजनच्या योग्य व्यवस्थापनामुळे सुदैवाने कोणीही दगावले नाही, याचे श्रेय महापालिकेची यंत्रणा आणि वैद्यकीय यंत्रणेला दिले. त्याचबरोबर ऑक्सिजन बाबत आत्मनिर्भर होताना सीएसआर निधीतून मदत देण्याबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तात्काळ पुढे येऊन मुंबईतील पाच आणि अन्य दोन अशा सात ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारल्याबद्दल कंपन्यांचे आभार मानले.



मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे पाठबळ आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने नवीन पाच ऑक्सिजन निर्मिती संयंत्र सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून यामुळे मुंबईतील रुग्णालयांना चांगली रुग्णसेवा करून दिलासा देता येईल असा विश्वास व्यक्त केला.

आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला थोपविण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सक्षमपणे तयार असल्याचे यावेळी सांगितले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here