पुणे, 2 जुलै : गुरुवारी ‘डॉक्टर डे’च्या (National Doctor’s Day) दिवशीच पुण्यातील डॉक्टर दाम्पत्यानं (Doctor Couple) आत्महत्या (commits suicide) केली होती. यामुळे पुण्यात (Pune) खळबळ उडाली आहे. वानवडी येथील आझादनगरमध्ये हे डॉक्टर दाम्पत्य राहत होतं. डॉ. अंकिता शेंडकर आणि डॉ. निखिल शेंडकर अशी मृत डॉक्टर दाम्पत्यांचं नावं आहे. आता या डॉक्टर दाम्पत्य आत्महत्याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अंकिता BHMS डॉक्टर आणि निखिल BAMS डॉक्टर होता. काही महिन्यांपूर्वीचं दोघांचं लग्न झालं होतं. दोघंही वानवडी भागातील आझादनगरमध्ये एका बंगल्यात राहत होते.
गेल्या तीन महिन्यांपासून निखिल पुण्यातील करसुर्डी (Karsurdi village near Yavat in Pune district) गावाजवळील यावत येथे डॉक्टरकीची प्रॅक्टिस करीत होता. तर अंकिता वानवडी येथील एका क्लिनिकमध्ये काम करीत होती. बुधवारी निखिलला त्याच्या एका रुग्णाकडून फोन आला होता. त्याच्या रुग्णाला मानसिक आजार होता. मात्र तो करसुर्डी येथे असल्याने त्याने पत्नी अंकिताना रुग्णाला अटेंड करण्यास सांगितलं. मात्र तिने यासाठी नकार दिला, अशी माहिती पोलिसांनी पीटीआयला दिली आहे.