[ad_1]
Pune Doctor Couple suicide: पुण्यातल्या डॉक्टर दाम्पत्य आत्महत्या प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. जाणून घ्या त्यामागचं कारण.
पुणे, 02 जुलै: गुरुवारी डॉक्टर डे (National Doctor’s Day) दिवशीच डॉक्टर दाम्पत्यानं (Doctor Couple) आत्महत्या (commits suicide) केल्याची घटना घडली. पुण्यातल्या (Pune) वानवडी येथील आझादनगरमध्ये हे डॉक्टर दाम्पत्य राहत होतं. डॉ. अंकिता शेंडकर आणि डॉ. निखिल शेंडकर अशी मृत डॉक्टर दाम्पत्यांचं नाव आहे. आता या डॉक्टर दाम्पत्य आत्महत्याप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे.
कौटुंबिक घरगुती वाद झाल्यानं दोघांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या पत्नीनं आधी आत्महत्या केली. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता BHMS डॉक्टर आणि निखिल BAMS डॉक्टर होता. काही महिन्यांपूर्वीचं दोघांचं लग्न झालं होतं. दोघंही वानवडी भागातील आझादनगरमध्ये एका बंगल्यात राहत होते. दोघांच्या नात्यात खूप तणाव होता. त्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडण होत होती. मंगळवार आणि बुधवारीही दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता.
हेही वाचा- लवकरच लहान मुलांना मिळणार कोरोना लस, राज्यात क्लिनिकल ट्रायलचा तिसरा टप्पा
बुधवारी दोघांची फोनवर काही कारणास्तव भांडण झालं. पती निखिलनं अंकिताचा फोन बोलतानाच मध्येच डिस्कनेक्ट केला. त्यानंतर अंकिता आपल्या रुममध्ये गेली आणि तिनं गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी घरी परत आल्यावर निखिलनं अंकिताचा मृतदेह तिच्या खोलीत पाहिला. पत्नीचं मृत्यू सहन न झाल्यानं पती निखिलनं ही पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत पंख्याला लटकलेले आढळून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरकाम करणारी महिला नोकर सकाळी घरी गेल्यावर या घटनेचा उलगडा झाला. बऱ्याच वेळ दार न उघडल्यानं महिलेनं शेजाऱ्यांना याची माहिती दिली. शेजारच्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर डॉक्टर दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या खोलीत आढळून आले.
[ad_2]
Source link