[ad_1]
यानंतर, तिने स्वत:तील उणीवा आणि सवयींचा अगदी बारकाईने विचार केला आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमध्ये तिने घरातच वर्कआउट करून आणि निरोगी डाएटद्वारे केवळ 2 महिन्यांतच 16 किलोग्रॅम वजन कमी केलं. चला तर जाणून घेऊया सोमाशींचा हा प्रवास कसा होता.
- नाव – सोमांशी वर्मा
- काम – इंटिरियर डिझायनर व स्टायलिस्ट
- वय – २२ वर्षे
- उंची – ५ फूट ४ इंच
- शहर – देहरादून
- सर्वाधिक वजन – ८६ किलोग्रॅम
- वेट लॉस – १६ किलोग्रॅम
- वजन कमी करण्यास लागलेला कालावधी – २ महिने
कशी सुरू झाली वेट लॉस जर्नीला सुरुवात
सोमांशी सांगते की कोरोनाने जेव्हा जगात शिरकाव केला आणि आपल्या देशात लॉकडाऊन लागला तेव्हाच तिने वजन कमी करण्यास सुरुवात केली. ती पदवीच्या दुसर्या वर्षाला शिकत होती आणि होळीच्या उत्सवासाठी घरी आली होती. ती सांगते की लहानपणापासूनच ती थोडी हेल्दी होती. ज्यामुळे लोक बर्याचदा तिला वेगवेगळ्या नावाने संबोधत असत. बरेच लोक तिच्यावर वाईट टिकाही करत असत. पण जेव्हा ती घरी आली तेव्हा तिला समजले की तिच्या या वाढत्या वजनामागचे खरे कारण जंक आणि स्ट्रीट फूड आहे. याव्यतिरिक्त आता वाढत्या वजनामुळे तिला हार्मोनल समस्याही येऊ लागल्या होत्या. त्यानंतरच तिने ठरविले की आता या वाढलेल्या वजनाचे काहीतरी करावे लागेल. यानंतर तिने योग्य आहार आणि वर्कआउटच्या मदतीने वाढलेले वजन वेगाने कमी केले.
डाएट
पोहे, ओट्स दुधासह, चीज ब्रेड टोस्ट, तुपासह बटाट्याचे पराठे, एग सँडविच. यापैकी ती कोणत्याही एका गोष्टीचे सेवन करीत असे
डाळ किंवा भाजी आणि एक चपाती, एक वाटी दही आणि व्हेजिटेबल सॅलेड
- रात्रीचे जेवण –
ती दुपारसारखाच आहार रात्रीही घेत असे. फक्त रात्री चपाती खाणे टाळत असे
- प्री वर्कआउट मील –
एक सफरचंद
- पोस्ट वर्कआउट मील –
२ ते ३ अंड्याचा सफेद भाग
- चीट डे मील –
सोमांशीला बटाट्याचे पराठे खूप आवडतात आणि चीट डेला ती बटाट्याचे पराठे लोणच्या सोबत खायची
पॉपकॉर्न, सफरचंद, पोहे, राजमा राईस विथ मेक्सिकन ट्विस्ट
फॉलो करायची हे वर्कआउट
वजन कमी करण्यात जरी आहाराची भूमिका 70 ते 80 टक्के असली तरी याचा अर्थ असा मुळीच नाही की व्यायामाचे वेट लॉसमध्ये कोणतेही योगदान नाही. सोमांशी सांगते की ती एक दिवस सायकल चालवत असे आणि दुसर्या दिवशी 8 किमी चालत असे. तसेच, दररोज अर्धा तास ती बॉक्सिंग देखील करायची.
फिटनेस सिक्रेट काय आहे?
सोमांशी म्हणते की वजन कमी करण्यासाठी आपण नियमित योग्य व्यायाम आणि हेल्दी आहार या दोन्ही गोष्टी गोष्टींचे कटाक्षाने पालन करणे महत्वाचे आहे. त्याचवेळी, ती म्हणते की कधी कधी आहार सोडून काहीतरी वेगळं खाणं देखील तितकंच आवश्यक असतं. ती म्हणते की चीट डे हा तिच्यासाठी प्रेरणेचा एक डोस ठरायचा. 2 आठवड्यातून एकदाच ती काहीतरी आहारापेक्षा वेगळं व चटपटीत पदार्थ खायची. हीच पद्धत सोमांशीला प्रेरणा द्यायची आणि तिला वेट लॉस जर्नीत पुढे जाण्यासही मदत करायची.
लाइफस्टाइलमध्ये केले बदल
सोमांशी सांगते की तिने आपल्या जीवनशैलीत सर्वात मोठा केलेला बदल म्हणजे तिने आयुष्यातून सर्व प्रकारच्या जंक फूड, चिप्स, कोला सारख्या अनहेल्दी गोष्टी कायमच्या बाद केल्या. याव्यतिरिक्त तिने हेल्दी अन्नपदार्थ घरच्या घरी बनवण्याची पद्धत देखील शिकून घेतली. हे बदल होते, जे मुख्यतः तिने आयुष्यात केले.
(वाचा :- या 120 किलो वजनाच्या मुलीला लागायचे XXL साइजचे कपडे, ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने घटवलं 30 Kg वजन!)
टीप – या लेखामध्ये सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीलाच लागू होतील असे नाही. त्यामुळे या लेखात सांगितलेला वेट लॉस प्लान तुम्हीही फॉलो करावा असं काही नाही. तुम्ही तुमच्या ओळखीच्या आहारतज्ज्ञ, डॉक्टर किंवा जाणकारांच्या सल्ल्यानेच स्वत:च्या शरीरासाठी योग्य असा वेट लॉस प्लान बनवून तो फॉलो करावा.
[ad_2]
Source link