Home पुणे Pune Lockdown: पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौरांनी ट्वीट करुन दिली माहिती | Coronavirus-latest-news

Pune Lockdown: पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौरांनी ट्वीट करुन दिली माहिती | Coronavirus-latest-news

0
Pune Lockdown: पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौरांनी ट्वीट करुन दिली माहिती | Coronavirus-latest-news

[ad_1]

पुण्यात कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी, महापौरांनी ट्वीट करुन दिली माहिती

Pune Lockdown: पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पुणे, 03 जुलै: येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असतील. (Pune Corona Virus)पुण्याचा दर मागच्या तुलनेत वाढत असल्याचं म्हणत 4.6 पॉझिटिव्हिटी रेट होता आता 5.3 झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील (Pune Lockdown) नियमावली सुरू ठेवायचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली आहे. दरम्यान पुण्यातल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पुण्यात यावेळी कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी !आपल्या मागणीवरुन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मनपा हद्दीतील कोचिंग क्लासेस सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली असून या संदर्भातील मागणी आपण पालकमंत्री आढावा बैठकीत केली होती. स 7 ते दु 4 या वेळेत शर्थींसह परवानगी असेल.

अजित पवारांनी दिली निर्बंधाची माहिती

मॉल सुरू करावे का असा विचार होता. पण सेंट्रल एसीमुळे अधिकारी मॉल सुरु करण्यास नकार देत असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. दुसऱ्या लाटेत लागलेल्या ऑक्सिजन पेक्षा तिप्पट ऑक्सिजन तयार करायची क्षमता तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये क्लासेस सुरू करणार पण विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्या दोन्ही लसीकरण केलेलं पाहिजे, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. लसीकरण झालं असेल तर 18 वर्षापुढील खेळाडूंना इनडोर गेमला परवानगी देत असल्याचंही ते म्हणालेत.

हेही वाचा- धक्कादायक पत्रानंतर सचिन वाझेची पुन्हा चौकशी, होणार मोठा खुलासा?

पुण्यात काय राहणार सुरू, काय बंद?

पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यात सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार

अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद

मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.

रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवाररविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.

खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत

अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने

उद्याने, मैदाने, जॉजींग, रनींग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.


Published by:
Pooja Vichare


First published:
July 3, 2021, 10:37 AM IST



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here