[ad_1]
या लव्ह हँडलने तुम्हाला देखील त्रास दिला असेल आणि तुम्हाला सुद्धा यापासून सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात, व्यायामात आणि जीवनशैली मध्ये काही बदल करावे लागतील. तेव्हाच लव्ह हँडल कमी होईल. आज या लेखातून आम्ही तुम्हाला लव्ह हँडल पासून सुटका मिळवण्याचे काही नैसर्गिक आणि साधेसोपे उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
कमीत कमी शुगर
जास्त शुगरच्या सेवनाने शरीरात फॅट जमा होते. जर तुम्ही तुमच्या आहारातील शुगर कमी केली तर तुमचा आहार संतुलित होईल. कुकीज, कॅन्डीज, स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि सोडा सारखे पदार्थ यांमध्ये जास्त शुगर असते आणि त्यामुळे कॅलरीचे प्रमाण जास्त असते. व याचा परिणाम म्हणून फॅट वाढते. जास्त शुगर घेतल्याने हृदय रोग, मेटाबॉलिज्म सिंड्रोम आणि मधुमेह यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक संशोधनांमधून हे सिद्ध झाले आहे की जास्त गोड खाल्ल्याने पोटाची चरबी वाढत जाते.
(वाचा :- White Bread : पांढऱ्या ब्रेडमुळे कमकुवत होतंय तुमचं शरीर, ‘या’ गंभीर आजारांचा करावा लागेल सामना)
हेल्दी फॅटवर फोकस करा
अॅव्हाकाडो, नट्स यांसारख्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करा हेल्दी फॅट केवळ चवीलाच चांगले नसतात तर यामुळे आरोग्य सुद्धा सुधारते आणि वजन देखील वाढत नाही. 7000 पेक्षा जास्त लोकांवर केलेल्या एका संशोधनात हे दिसून आले की या पदार्थांमुळे त्यांचे वजन खूप कमी झाले आणि पोटात चरबी सुद्धा वाढली नाही. कमी पोषक तत्वांनी युक्त खाद्यपदार्थांच्या ऐवजी असे खाद्यपदार्थ तुमच्या शरीरातील चरबी कमी करू शकतात.
(वाचा :- Quick weight loss: तरुणीने जेवणातून ‘हा’ पदार्थ बाद करून फक्त २ महिन्यांत घटवलं तब्बल 16 Kg वजन!)
खूप वेळ एकाच जागी बसून राहणे
खूप वेळ एकाच जागी बसून राहिल्याने सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात आणि लव्ह हँडल वाढू लागते. त्यामुळे तुम्ही जर एकाच जागी खूप वेळ बसून काम करत असाल तर मध्ये मध्ये उठून ब्रेक घ्या, चाला आणि थोडा आराम करा. यामुळे शरीराची हालचाल होत राहील आणि फॅट बर्न होईल. ज्याचा परिणाम म्हणून लव्ह हँडल निर्माणच होणार नाही. हा अत्यंत एक साधा सोपा उपाय आहे जो तुम्ही या स्थितीत करायलाच हवा.
कार्डिओ वर्कआउट
शरीराला योग्य शेप मध्ये आणण्यासाठी कार्डिओ वर्कआउट केले जाते. लव्ह हँडल्स कमी करण्यासाठी तुम्ही एरोबिक्स, डान्सिंग, स्विमिंग, झुंबा, रनिंग हे व्यायाम प्रकार ट्राय करू शकता. जाणकार देखील लव्ह हँडल कमी करण्यासाठी कार्डिओ खूप प्रभावी असल्याचे सांगतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की वापरा. यामुळे तुम्हाला अगदी काही दिवसांतच फरक दिसून येईल आणि मग तुम्ही सुद्धा हळूहळू आपल्या लव्ह हँडल पासून कायमची सुटका मिळवाल.
प्रोटीन डाएट वाढवा
आपल्या आहारात उच्च गुणवत्तेचे प्रोटीन समविष्ट केल्याने लव्ह हँडल कमी करण्यात सहाय्यता मिळू शकते. प्रोटीन तुमच्या आहाराला पूर्ण करते आणि पोट देखील पूर्ण भरते यामुळे भूक नियंत्रित राहते. कमी खाल्ले तरी भूक पूर्ण झाल्या सारखी वाटते. अभ्यासातून हे दिसून आले आहे की प्रोटीनने समृद्ध असलेला आहार पोटाची चरबी कमी करण्यासाठी कमी प्रोटीनयुक्त आहाराच्या तुलनेमध्ये अधिक प्रभावी असते. आपल्या आहारात अंडी, नट्स, बीज, फळे यांसारख्या जास्त गुणवत्तेच्या प्रोटीनचा समावेश करा. यामुळे लव्ह हँडल लवकर कमी होईल.
भरपूर पाणी प्या आणि स्ट्रेस कमी घ्या
शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे देखील आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला वजन कमी करणे सोपे होईल आणि पोटावर चरबी जमा होणार नाही. पाणी आपल्याला बर्याच वेळेसाठी संतुष्ट ठेवते जेणेकरून आपण कमी कॅलरीजचे सेवन करतो. मानसिक स्ट्रेसमुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक प्रभाव पडतो आणि पोटाची चरबीही वाढू शकते. कारण तणाव हार्मोन कोर्टिसोलच्या उत्पादनास ट्रिगर करतो. तसेच याला स्ट्रेस हार्मोन म्हणून सुद्धा ओळखले जाते.
शांत व पूर्ण झोप घ्या
कमी झोप घेणे हे देखील शरीरात चरबी जमा होण्यासाठी जबाबदार घटकांपैकी एक महत्वाचा घटक आहे. यामुळे शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे वजन वाढण्यास सुरवात होते. असे दिसून येते की जे लोक पुरेशी झोप घेत नाही त्यांचे वजन वाढते. पाच वर्षांत 1000 हून अधिक लोकांवर केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की जे लोक रात्री दररोज पाच तासांपेक्षा कमी झोपतात त्यांचे वजन जास्तीत जास्त वाढते आणि रात्री 7 ते 8 तास झोप घेतात त्यांच्या तुलनेत कमी झोप घेणा-या लोकांच्या पोटाची चरबीही अधिक असते.
[ad_2]
Source link