[ad_1]
आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्निलनं सुसाईड नोट लिहिली होती. मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका, असं त्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे
पुणे, 4 जुलै : पुण्यातील (Pune) स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात टीकेची झोड उठली आहे. कोरोनामुळे आधीच नागरिकांच्या नाकी नऊ आले आहेत. त्यात पुण्याच्या तरुणाने उचलेल्या या पावलामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विरोधकांपासून अगदी ठाकरे सरकारमधील नेत्यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. अखेर राज्य सरकारला जाग आली असून त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Big decision taken regarding MPSC exam)
MPSC ची परीक्षा दोन वर्षांपूर्वी पास केली मात्र अजूनही नोकरी न लागल्यामुळे पुण्यातील स्वप्नील सुनील लोणकर (वय 24) या विद्यार्थ्याने फुरसुंगी इथे राहत्या घरी त्यानं आत्महत्या केली आहे. स्वप्नीलचे वडील हे प्रिंटिंगचा व्यवसाय करतात. स्वप्नील हा सिव्हिल इंजिनिअर (Civil engineer) होता आणि त्यानं मोठ्या जिद्दीनं MPSC ची परीक्षा दिली होती आणि उत्तीर्णही झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याला नोकरी मिळाली नव्हतो. यामुळे तो नैराश्यात गेला होता. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
आज (4 जुलै) स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरणावरून मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्यातील विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता एमपीएससी परीक्षे संदर्भात राज्य सरकार समिती गठीत करणार आहे. ही समिती एमपीएससी परीक्षेसंदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. आता राज्य सरकार यावर पावले उचलत आहेत. त्यामुळे स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येनंतर आता कुठे सरकारला जाग आल्याची प्रतिक्रिया दिली जात आहे.
हे ही वाचा-MPSC परीक्षा सुरळीत न झाल्यानं नैराश्यात जाऊन पुण्यात विद्यार्थ्याची आत्महत्या
स्वप्नीलची खिन्न करणारी सुसाइड नोट
आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्निलनं सुसाईड नोट लिहिली होती. मी घाबरलो, खचलो मुळीच नाही.फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, एमपीएससी मायाजाल आहे यामध्ये पडू नका, असं त्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे
[ad_2]
Source link