Home क्रीडा झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा साकारणार प्रमुख भूमिका, निळ्या जर्सीमधला फोटो व्हायरल | Actress Anushka Sharma play lead Role in Jhulan Goswami biopic Photo Viral on Social Media

झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा साकारणार प्रमुख भूमिका, निळ्या जर्सीमधला फोटो व्हायरल | Actress Anushka Sharma play lead Role in Jhulan Goswami biopic Photo Viral on Social Media

0
झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा साकारणार प्रमुख भूमिका, निळ्या जर्सीमधला फोटो व्हायरल | Actress Anushka Sharma play lead Role in Jhulan Goswami biopic Photo Viral on Social Media

[ad_1]


भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिच्या आयुष्यावर तसंच क्रिकेट कारकीर्दीवर एक सिनेमा येतोय. झुलनच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) प्रमुख भूमिका साकारणार आहे.

झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा साकारणार प्रमुख भूमिका, निळ्या जर्सीमधला फोटो व्हायरल

झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा साकारणार प्रमुख भूमिका

मुंबई : भारतीय महिला संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिच्या आयुष्यावर तसंच क्रिकेट कारकीर्दीवर एक सिनेमा येतोय. झुलनच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) प्रमुख भूमिका साकारणार आहे. विराट आणि अनुष्काच्या (Virat Anushka) चाहत्यांसाठी ही गुडन्यूज आहे. (Actress Anushka Sharma play lead Role in Jhulan Goswami biopic Photo Viral on Social Media)

झुलनच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. येत्या 4 ऑगस्टपासून भारतीय संघाला इंग्लंडबरोबर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. WTC अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंना त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी जवळपास तीन आठवड्यांचा वेळ मिळाला. खेळाडू आपल्या कुटुंबासमवेत वेळ व्यतित करत आहे. विराटबरोबर त्याची पत्नी अनुष्का आणि लेक वामिका देखील आहे. अनुष्का गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटापासून दूर आहे. शाहरुख खानबरोबर ‘जीरो’ चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसली नाही. आता लवकरच प्रेक्षकांची ओढ संपणार आहे. झुलनच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा प्रमुख भूमिका साकारणार आहे.

अनुष्काचे निळ्या रंगाच्या जर्सीमधले फोटो व्हायरल

चकदहा एक्सप्रेस या नावानं झुलन गोस्वामी प्रसिद्ध आहे. जगातील सगळ्यात वेगवान महिला गोलंदाजांपैकी झुलन एक मानली जाते. 2020 च्या सुरुवातीला झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याची चर्चा होती. ईडन गार्डन्स मैदानावर या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटोज देखील व्हायरल झाले होते. ज्यामध्ये अनुष्का निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये दिसून आली होती. त्यानंतर चित्रपटाविषयी फार काही चर्चा झाली नाही. परंतु आता पुन्हा एकदा अनुष्काचे निळ्या जर्सीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

चित्रपटाचे शूटिंग कधी?

बॉलिवूड हंगामा छापलेल्या रिपोर्टनुसार, बायोपिकच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरु आहे. अशात 2021 संपण्याच्या अगोदर चित्रपटाचे शुटींग सुरु होणार नाही. 2022 च्या सुरुवातीला चित्रपटाचे शूटिंग सुरु होऊ शकतं, असा अंदाज आहे. अनुष्का सध्या विराटबरोबर इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे चित्रपटाचं शुटिंग लगोलग सुरु होण्याची कोणतही आशा नाहीय.

झुलनचं क्रिकेट करिअर

महिला क्रिकेटमधील सर्वांत महान गोलंदाज झुलन गोस्वामीने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 19 वर्ष पूर्ण केलेल्या झुलन गोस्वामीने महिला क्रिकेटमध्ये 300 पेक्षा अधिक विकेट मिळवणारी जगातील एक मात्र गोलंदाज आहे. झुलनने आपल्या इंटरनॅशनल क्रिकेट करियर मध्ये 333 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट घेणारी झुलन जगातील एकमेव गोलंदाज आहे. तिने 180 एकदिवसीय क्रिकेट मॅचेसमध्ये 236 विकेट घेतल्या आहेत तर 11 कसोटी सामन्यात तिने 41 महिला फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. 68 टी ट्वेंटी सामन्यात 56 विकेट तिच्या नावावर आहेत.

(Actress Anushka Sharma play lead Role in Jhulan Goswami biopic Photo Viral on Social Media)

हे ही वाचा :

मिताली राजचा भीमपराक्रम, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील यशाचे शिखर गाठत तेंडुलकरच्या पंगतीत मिळवले स्थान

Video : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात स्मृतीने झेप घेत टिपला अप्रतिम झेल, व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमी खुश

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here