Home क्रीडा Euro 2020 : युक्रेनला मात देत इंग्लंड विजयी, चेक रिपब्लिकला नमवत डेन्मार्कही सेमीफायनलमध्ये दाखल | In Euro Cup England Win over Ukraine And Denmark Defeated czechs in Quarter Final and enters in Semis

Euro 2020 : युक्रेनला मात देत इंग्लंड विजयी, चेक रिपब्लिकला नमवत डेन्मार्कही सेमीफायनलमध्ये दाखल | In Euro Cup England Win over Ukraine And Denmark Defeated czechs in Quarter Final and enters in Semis

0
Euro 2020 : युक्रेनला मात देत इंग्लंड विजयी, चेक रिपब्लिकला नमवत डेन्मार्कही सेमीफायनलमध्ये दाखल | In Euro Cup England Win over Ukraine And Denmark Defeated czechs in Quarter Final and enters in Semis

[ad_1]


कर्णधार हॅरी केनने केलेल्या अप्रतिम गोल्सच्या जोरावर इंग्लंडने युक्रेनला नमवत सेमीफायनल गाठली आहे. दुसरीकडे डेन्मार्क चेक रिपब्लिकला 2-1 ने मात देत सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.

Euro 2020 : युक्रेनला मात देत इंग्लंड विजयी, चेक रिपब्लिकला नमवत डेन्मार्कही सेमीफायनलमध्ये दाखल

गोल केल्यानंतर आनंद व्यक्त करताना इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन

रोम : युरो चषक (Euro Cup 2020) स्पर्धा आता अंतिम टप्प्य़ात पोहोचली आहे. आतापर्यंतचे सर्वच सामने अत्यंत चुरशीचे झाले. अनेक अनपेक्षित निकालही स्पर्धेत समोर आले. दरम्यान उपांत्य पूर्व फेरीचे अखेरचे दोन सामने देखील शनिवारी पार पाडले ज्यातून इंग्लंड (England) आणि डेन्मार्क (Denmark) हे दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत. इंग्लंडने युक्रेनवर 4-0 असा दणदणीत विजय मिळवला. तर डेन्मार्कने चेक रिपब्लिकला 2-1 ने मात देत सेमीफायनल गाठली आहे. इंग्लंडकडून कर्णधार हॅरी केनने सुरुवातीचे दोन गोल करत संघाला सामन्यात मजबूत स्थान मिळवून दिलं होत. (In Euro Cup England Win over Ukraine And Denmark Defeated czechs in Quarter Final and enters in Semis)

इंग्लंडचा दणदणीत विजय

इंग्लंड आणि युक्रेन (England vs Ukraine) यांच्यातील सामन्यात सुरुवातीपासूनच इंग्लंडचा दबदबा होता. सामना सुरु होऊन चार मिनिट झाले तेव्हाच कर्णधार हॅरी केनने (Harry Kane) कर्णधारी खेळी करत पहिला गोल केला. त्यानंतर पहिला हाल्फ होईपर्यंत दोन्ही संघाना गोल करता आला नाही आणि स्कोर 1-0 राहिला. त्यानंतर दुसरा हाल्फ सुरु होताच इंग्लंडने पुन्हा आक्रमक खेळी करत एका मागोमाग एक गोल केले. 46 व्या मिनिटाला हैरी मॅगुयरने, 50 व्या मिनिटाला हॅरी केनने आणि 63 व्या मिनिटाला जॉर्डन हेंडरसनने गोल करत सामना 4-0 ने खिशात घातला.

डेन्मार्कची चेक रिपब्लिकवर 2-1 ने मात

इंग्लंड आणि युक्रेन प्रमाणेच डेन्मार्क (Denmark) आणि चेक रिपब्लिक (Czech Republic) यांच्यातही सेमीफायनलमध्य प्रवेश मिळवण्यासाठी सामना सुरु होता. ज्यात 2-1 ने विजय मिळवत डेन्मार्कने सेमीफायनचे तिकीट मिळवले. सामना सुरु होताच 5 व्या मिनिटाला डेन्मार्कच्या जेंस स्ट्राइगर लार्सनने मारलेल्या कॉर्नर किकवर थॉमस डेलाने याने हेडरने गोल करत सामन्यात 1-0 ची आघाडी मिळवली. त्यानंतर हाल्फ टाईम व्हायला काही मिनिटं शिल्लक असताना 42 व्या मिनिटाला जोआकिम मेहलेच्या मदतीने डॉलबर्ग याने गोल करत डेन्मार्कला 2-0 ची आघाडी मिळवून दिली. हाल्फ टाईमनंतर चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक स्किकने 49 व्या मिनिटाला गोल करत सामन्यात वापसी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सामना संपेपर्यंत चेक रिपब्लिकने केवळ एकच गोल केल्याने डेन्मार्कने 2-1 ने सामन्यात विजय मिळवला.

सेमी-फायनलमध्ये डेन्मार्क इंग्लंड आमने सामने

उपांत्य पूर्वी फेरीतील या विजयासह इंग्लंड आणि डेन्मार्क हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहे. आता इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यात 8 जुलैला भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी सेमीफायनचा सामना रंगणार आहे. तर 7 जुलैला इटली आणि स्पेन यांच्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी दुसरा सेमीफायनचा सामना पार पडणार आहे.

हे ही वाचा :

Euro 2020 : बेल्जियमला मात देत इटली विजयी, सेमीफायनलमध्ये स्पेनशी होणार सामना

Euro 2020 : बाद फेरीचे सामने संपले, आता 8 अंतिम संघामध्ये रंगणार युद्ध, वाचा उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

(In Euro Cup England Win over Ukraine And Denmark Defeated czechs in Quarter Final and enters in Semis)



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here