Home महाराष्ट्र jalgaon barber suicide latest news: Jalgaon Barber Suicide: लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या सलून व्यावसायिकाची आत्महत्या – salon shut due to lockdown debt ridden barber ends his life

jalgaon barber suicide latest news: Jalgaon Barber Suicide: लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या सलून व्यावसायिकाची आत्महत्या – salon shut due to lockdown debt ridden barber ends his life

0
jalgaon barber suicide latest news: Jalgaon Barber Suicide: लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या सलून व्यावसायिकाची आत्महत्या – salon shut due to lockdown debt ridden barber ends his life

[ad_1]

हायलाइट्स:

  • जळगावात कर्जबाजारी सलून व्यवसायिकाची आत्महत्या.
  • लॉकडाऊन काळात सलून बंद झाल्याने आर्थिक कोंडी.
  • पैसे परत मागणाऱ्यांचा तगादा सुरू झाल्याने जीवन संपवले.

जळगाव: सततच्या लॉकडाऊन मुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने व कर्जबाजारी झाल्याने जळगावातील एका सलून व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता ही घटना उघडकीस आली. गजानन कडू वाघ (वय ३५, रा. लक्ष्मीनगर) असे मृत सलून व्यवसायिकाचे नाव आहे. ( Jalgaon Barber Suicide Latest News )

वाचा: सलमानच्या फार्महाऊसजवळ दुर्घटना; धबधब्याच्या डोहात ‘तो’ पडला आणि…

गजानन वाघ गेल्या वर्षीपासून जळगाव शहरात स्थायिक झाले होते. लक्ष्मीनगरात खोली भाड्याने घेऊन तिथे ते पत्नी व दोन मुलांसह राहत होते. सलून दुकानावर कारागीर म्हणून ते काम करीत होते. पहील्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे दुकाने बंद पडली. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला होता. सुरुवातीच्या काळात सलून दुकानदारांकडून काही प्रमाणात मदत मिळाली. मात्र लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे वाघ यांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळली. त्यातून त्यांनी हातउसनवारी करून घरखर्च भागवण्यास सुरुवात केली.

वाचा:ठाकरे सरकारची प्रसिद्धीत आघाडी!; १६ महिन्यांत तब्बल १५५ कोटी खर्च

अनलॉक झाल्यांनतरही पुरेसे काम त्यांना मिळत नव्हते. डोक्यावरील कर्ज वाढत चालले होते. यातून पैसे परत मागणाऱ्यांचा तगादा सुरू झाला होता. याच विंवचनेत असलेल्या वाघ यांनी शनिवारी मध्यरात्री राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ८.३० वाजता त्यांच्या पत्नी सरला यांच्या हा प्रकार लक्षात आला. लहान भाऊ इश्वर याच्यासह परिसरातील नागरीकांनी वाघ यांना खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. रविवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी माळपिंप्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत गजानन वाघ यांच्या पश्चात पत्नी सरला, आई लताबाई, मुलगा ऋषीकेश (वय ५) व मुलगी वैष्णवी (वय ३) असा परिवार आहे.

वाचा: ‘शिवसेना आमदार चिमणराव पाटलांचा एक पाय भाजपात!’

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here