[ad_1]
हायलाइट्स:
- राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून
- शिवसेनेचा भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर गंभीर आरोप
- ईडीकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी
आजपासून दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन सुरु होतंय. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याची रणनिती आखली असल्याच्या चर्चा आहे. यावरुन शिवसेनेनंही भाजपवर जोरदार टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं विरोधकांची कान टोचले आहेत. तर, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावरही गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या या उद्योगाचाही भांडाफोड होणे गरजेचं आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘अनिल देशमुखांपासून अनिल परब, प्रताप सरनाईक, रोहित पवार, अजित पवारांवर कारवाया करुन महाराष्ट्र सरकारची कोंडी करता या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत. या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केलं तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही,’ असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
वाचाः पावसाळी अधिवेशन गाजणार; ठाकरे सरकार आरक्षणाबाबत ठराव मांडणार
‘सरकारी पक्षावर आरोपांच्या फैरी झाडून नामोहरम करणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्यच आहे, पण त्या आरोपांत थोडे तरी तथ्य असायला हवे. महाराष्ट्रापुढे जे प्रश्न आहेत त्यातले अर्ध्याहून जास्त प्रश्न केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळेच निर्माण झाले आहेत. मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण हे तर पूर्णपणे केंद्र सरकारनेच हाताळायचे व निर्णय घ्यायचे विषय आहेत. या प्रश्नी राज्याच्या विधानसभेत गोंधळ घालून काय साध्य होणार? मराठा समाजाला आरक्षण मिळू देण्यात सरकारचे कायदेशीर प्रयत्न कमी पडल्याचा विरोधी पक्षाने सुरू केलेला बोभाटा एक बकवास आहे,’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे. तसंच, केंद्र सरकारही मराठा समाजाला आरक्षण देण्यात कमी पडले म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या दारात बसून अक्रोश करावा का?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
वाचाः ‘शिवसेना आमदार चिमणराव पाटलांचा एक पाय भाजपात!’
‘राज्य सरकार पाडण्याच्या व पडण्याच्या स्वप्नांतून महाराष्ट्रातील विरोधक बाहेर पडायला तयार नाहीत. त्यांची अवस्था ‘बेघर आणि बेकार’ असल्यासारखी झाली आहे. समाजातील बेघर आणि बेकार ही नक्कीच एक गंभीर समस्या आहे, पण राज्यातील बेघर आणि बेकार विरोधी पक्षाचे काय, हा खरा प्रश्न आहे. सत्तेचे छप्पर उडाल्याने बेघर आणि बेकार झालेल्या राज्याच्या विरोधकांनीही राज्यासाठी काही काम करायला हवे. मात्र तसे न करता काम करणाऱ्या सरकारपुढे अडचणी निर्माण करण्याचे उद्योग ते करीत आहेत,’ असा जोरदार टोला शिवसेनेनं लगावला आहे.
[ad_2]
Source link