[ad_1]
वाचा: ‘भाजपशी जुळवून घ्या’ म्हणणारे प्रताप सरनाईक प्रथमच मीडियासमोर
‘महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असतानाच्या सर्व घडामोडींमध्ये मी आणि माझी दोन्ही मुलं होती. सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरू असताना तिन्ही पक्षाच्या आमदारांची व्यवस्था पाहत होतो. सरकार आल्यानंतर ज्या-ज्या वेळी महाविकास आघाडीवर विरोधकांनी आरोप केले, तेव्हा पक्षाचा एक प्रवक्ता म्हणून उत्तरं देण्याचं कामही मी केलं होतं. अर्णव गोस्वामी, कंगना राणावत प्रकरणातही मी आक्रमकपणे सरकारची बाजू मांडत होतो. त्यामुळं मी विरोधकांच्या हिटलिस्टवर आलो. कारण नसताना माझ्या मागे ईडीची चौकशी लावण्यात आली. अशा वेळी माझ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या मागे राहायला हवं होतं. माझा पक्ष आणि पक्षप्रमुख ठामपणे माझ्या मागे उभा होता. पण सरकार म्हणून महाविकास आघाडी माझ्या मागे नव्हती. मीरा-भाईंदरमध्ये भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या व त्यांच्या मुलानं केलेल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण मी विधानसभेत लावून धरलं होतं. त्यावरही कारवाई झाली नाही. त्यामुळं उद्विग्न होऊन मी पत्र लिहिलं होतं,’ असं सरनाईक म्हणाले. मात्र, आता तो विषय संपला आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
वाचा: अनिल देशमुख यांचं ईडीला पुन्हा पत्र, आता केली ‘ही’ मागणी
वाचा: उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे; भाजपची खोचक टीका
[ad_2]
Source link