जपानमध्ये असणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे त्याठिकाणी ऑलम्पिकचे आयोजन करण्याबाबत अनेक चर्चा केल्या जात होत्या. जपानच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी देखील ऑलम्पिकच्या आयोजनाबाबत शंका व्यक्त केल्या होत्या
टोक्यो ऑलम्पिक 2020
टोक्यो : मागील वर्षी कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेली टोक्यो ऑलम्पिक 2020 (Tokyo Olympics) यंदा घेण्यात येणार आहे. जपान सरकारने ऑलम्पिकबाबतचे सर्व नियोजन करण्यास सुरुवात केली असून काही दिवसांतकच स्पर्धा सुरु होणार आहेत. मात्र स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने ऑलम्पिकचा दार ठोठावलं आहे. ऑलम्पिक खेळण्यासाठी आलेला सर्बियाचा एक खेळाडू कोरोनाबाधित आढळल्याने त्याला विमानतळावरुनच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने ऑलम्पिकमध्ये शिरकाव केल्याने जपान सरकारची डोकेदुखी वाढली आहे. (In Tokyo Olympics 2020 Corona Virus Issue Arrived With Corona Positive Serbia Athlete Comes To Japan)
जपानमध्ये ऑलम्पिकच्या आयोजनावरुन देशातूनच बराच विरोध होत आहे. तरीदेखील सरकार, आयोजन समिति आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिति निर्णयावर ठाम आहे. मात्र त्यातच समोर आलेल्या या कोरोनाबाधित सर्बियन खेळाडूमुळे ऑलम्पिकला होणारा विरोध वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जपान्चाय प्रसार माध्यमांच्या मते संबधित खेळाडू सर्बियाचा असून तो रविवारी (4 जुलै) टोक्योला पोहोचला होता. तो नौकायन दलाचा सदस्य असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान हा खेळाडू विमानतळावर पोहोचताच तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले, ज्यानंतर त्याला त्वरीत विलगीकरणात ठेवण्यात आले.
इतर खेळाडूंना केलं वेगळ, ट्रेनिंग कॅम्प होऊ शकतो रद्द
जपानी अधिकाऱ्यांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, संबधित कोरोनाबाधित खेळाडूसोबतच्या संघातील इतर सदस्यांनाही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. रविवारी (4 जुलै) टोक्यो पोहोचलेल्या या सर्बियाई दलातील खेळाडूंची हनेदा विमानतळावर तपासणी झाली. तेव्हा त्यांच्यातील एक खेळाडू कोरोनाबाधित आढळल्याने त्याला इतरांपासून दूर करण्यात आले. बाकी चौघांना हनेदा एयरपोर्टजवळील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान या संघाला सराव शिबिरात पाठवण्याची शक्यताही कमी असल्याने या सर्वांच्या खेळावर याचा परिणाम होऊ शकतो.
(In Tokyo Olympics 2020 Corona Virus Issue Arrived With Corona Positive Serbia Athlete Comes To Japan)