Home मनोरंजन Katrina Kaif Hot And Bold Short dress Look: कतरिनाने छोटा फ्रॉक घालून प्रियंकाला दिली तगडी स्पर्धा, क्युट लुकसमोर देसी गर्लचा बोल्ड अवतार पडला फिका

Katrina Kaif Hot And Bold Short dress Look: कतरिनाने छोटा फ्रॉक घालून प्रियंकाला दिली तगडी स्पर्धा, क्युट लुकसमोर देसी गर्लचा बोल्ड अवतार पडला फिका

0
Katrina Kaif Hot And Bold Short dress Look: कतरिनाने छोटा फ्रॉक घालून प्रियंकाला दिली तगडी स्पर्धा, क्युट लुकसमोर देसी गर्लचा बोल्ड अवतार पडला फिका

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आपली सुपर फिट फिगर फ्लाँट करण्याची एकही संधी सोडत नाही. पारंपरिक पोषाख असो किंवा वेस्टर्न आउटफिट, ही अभिनेत्री सर्वच पॅटर्नच्या कपड्यांमध्ये कमालच दिसते. एकीकडे बॉलिवूडमधील अन्य अभिनेत्री बोल्ड लुकमुळे ट्रोल होताना दिसतात, तर दुसरीकडे कतरिना प्लंजिंग नेकलाइन ड्रेस शानदार पद्धतीने कॅरी करते. एका मुलाखतीत कतरिनाला विचारण्यात आलं होतं की, ‘आपली स्टाइल ग्लॅमरस दिसण्यासाठी तु नेमकं काय करतेस?’

यावर तिनं उत्तर दिलं की, ‘तुम्हाला जे परिधान करण्याची इच्छा तेच परिधान करा. मग सुंदर दिसो वा वाईट…त्याबाबत कोणाचंही मत ऐकू नका’. याबाबत अभिनेत्रीच्या स्टायलिस्ट तान्या घावरीने सुद्धा म्हटलं होतं की, ‘कतरिना तिच्या कपड्यांच्या निवडीबाबत नेहमीच स्पष्ट असते. फॅशनिस्टा होण्याऐवजी तिला कम्फर्ट झोनमध्ये राहणं पसंत आहे’. याचीच झलक काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाली होती. कामानिमित्त बाहेर पडलेल्या कतरिनाचा सुंदर लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. तिनं आपल्या सुपर क्युट लुकने प्रियंका चोप्रालाही तगडी टक्कर दिल्याचं दिसलं. (फोटोज-योगेन शाह)
(दिवसरात्र पार्टी चाले! करीना व करिश्माच्या स्टायलिश लुकवर भारी पडली कपूर घराण्याची ‘ही’ लाडकी लेक)

​कतरिना कैफचा क्युट लुक

कतरिना कैफचा क्युट अवतार देखील चाहत्यांना अधे-मधे पाहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी रमेश तौरानी यांच्या मुंबईतील ऑफिसला कतरिनाने भेट दिली होती. या भेटीदरम्यान तिनं अतिशय कूल कॅज्युअल, कम्फर्ट आणि स्टायलिश कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळे तिला स्टायलिश बोल्ड लुक मिळाला होता.

(अ‍ॅनिमल प्रिंट बिकिनीमधील बॉलिवूड अभिनेत्रींचा हॉट व बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते झाले फिदा)

​छोट्या फ्रॉकमध्ये दिसत होती सुंदर

कतरिनाने क्लासिक कलर पॅलेट पॅटर्न सॉलिड मिनी पांढऱ्या रंगाच्या ए-लाइन ड्रेसची निवड केली होती. तिचा हा ड्रेस जबरदस्त स्टायलिश होता. कतरिनाच्या या आउटफिटचे पॅटर्न शॉर्ट मिनी लेंथमध्ये होते. ड्रेसमध्ये कॉलर नेकलाइनसह लूज फिटिंग फुल स्लीव्ह्जचा समावेश होता. यामुळे ड्रेसवरील लाइट प्लीट्स हाइलाइट होण्यास मदत मिळाली आहे. ड्रेसच्या कमरेच्या भागास बॉडीफिट ठेवण्याऐवजी फ्री-फॉल लुक देण्यात आला होता. यामुळे कतरिनाला कम्फर्टेबल लुक मिळाला होता.

(आकाश अंबानीच्या पार्टीत या सौंदर्यवतीमुळे शाहरुखचा जीव झाला येडापिसा, तिच्याकडेच पाहत होता एकटक)

​परफेक्ट स्टायलिंग

प्रिंट ऑन प्रिंट पॅटर्न असणारा हा ड्रेस पूर्णतः कॉटन फॅब्रिकपासून तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये रंगीबेरंगी धाग्यांपासून फ्लोरल मोटिफ्स तयार करण्यात आले होते. ड्रेसचे मटेरियल प्रचंड पातळ होतं. यासाठी अभिनेत्रीनं मॅचिंग शेडचं इनर वेअर परिधान केलं होतं. कतरिनाने या ड्रेसवर लाइट टोन मेकअप केला होता. तिनं डोळ्यांना केवळ बेसिक लायनर लावून हाइलाइट केले होते. आउटफिटमध्ये कॉन्ट्रास्टिंग इफेक्टसाठी तिनं चॉकलेटी रंगाचे Franco Sarto Sandals मॅच केले होते.

(सोनम कपूरच्या मेंदी सोहळ्यात करिश्माने घातला होता सुंदर लेहंगा, मोहक सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ)

कतरिना कैफचा हॉट लुक

​प्रियंकाचा बोल्ड लुक पडला फिका

काही दिवसांपूर्वी आई मधु चोप्रा यांच्यासह एक इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रियंका चोप्राने देखील छोटा सी रफल पॅटर्न फ्रॉक परिधान केला होता. हा ड्रेस इंटरनॅशनल फॅशन डिझाइनर Ulla Johnsonने डिझाइन केला होता. प्रियंकाचा हा ड्रेस स्किनी फिट पॅटर्नमधील होता. ज्यामध्ये थ्री लेअरिंगसह रफल डिझाइन जोडण्यात आलं होतं.

ड्रेसमध्ये प्लंजिंग नेकलाइन आपण पाहू शकता. ज्यामध्ये पफी शोल्डर्ससह फुल स्लीव्ह्ज जोडण्यात आले होते. ड्रेसचे पॅटर्न शॉर्ट मिनी लेंथमध्ये ठेवण्यात आलं होते. प्रियंकाचा हा ड्रेस प्रचंड सुंदर दिसत होता, पण या अभिनेत्रीचा एकसारखाच अवतार वारंवार पाहायला मिळतोय. त्यामुळे तिचा लुक बोरिंग वाटत होता.

(आलिया भटने बहिणीच्या लग्नात घातला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, सर्वजण तिलाच पाहत होते एकटक)



[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here