भिवंडीतील नारपौली वाहतूक विभागातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणल्यामुळे दुखावलेल्या तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनीच मला सुभद्रा पवार या पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात अडकवले. वाहतूक विभागात सुरू असलेला कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार थांबवण्यासाठी प्रयत्न केल्याने परमवीर सिंग यांनी खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा आरोप नाशिक ग्रामीणमध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलिस अधिक्षक शामकुमार निपुंगे यांनी केला. (Assistant Superintendent of Police Shamkumar Nipunge accuses former Mumbai Police Commissioner Parambir Singh)
मुंबईचे पोलिस आयुक्त असताना गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रूपयांचा हप्ता मागितल्याचा आरोप असलेले परमबीर सिंग यांच्यापुढील कायदेशीर समस्या आता नव्याने वाढल्या आहेत. परमबीर सिंग यांच्याविरोधात अन्य काही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सुद्धा यापूर्वी आरोप केले असून, या गुन्ह्याचा तपास पोलिस करीत आहेत. सहायक पोलिस आयुक्त म्हणून ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निपुंगे यांच्या कार्यालयातील सुभद्रा पवार या महिला पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यात निपुंगे यांच्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
क्लिक करा आणि वाचा- ‘१२ जणांचं निलंबन केलं पण आघाडी सरकारचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात’
या आरोपांबाबत बोलताना निपुंगे यांनी सांगितले की, मी नारपौली येथील गैरव्यवहाराची माहिती संकलीत करण्यास सुरूवात केली होती. त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक थेट परमबीर सिंग यांचे नाव घेऊन एक कोटी रूपये देऊन बदली घेतल्याचे सांगत होते. सुभद्रा पवार हीची हत्या तिचा प्रियकर अमोल फफाळे याने केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे समोर होते. मात्र, मोबाईल लोकेशन, मी, सुभद्रा, अमोल फफाळे आणि सुभद्राचा भाऊ सुजीत पवार यांच्यातील संभाषण कोर्टाला सादरच करण्यात आले नाही. पोस्ट मार्टमचे रेकॉर्डींग करण्यात आले. छायाचित्र घेण्यात आले होते. प्रत्यक्ष फिर्याद आणि हे पुरावे यांची सांगड बसत नसल्याने ते पुरावेही दाबण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा- फडणवीसांना सभागृहात बोलूच दिले नाही, भुजबळांना मात्र मुभा, यामुळे भाजप आमदार झाले आक्रमक
२०१७ नंतर मी सर्व कागदपत्रे मिळविण्यात सुरूवात केली. एक एक कडी जोडून सुभद्रा पवार हिच्या हत्या प्रकरणात माझा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पुराव्यांची सांगड आणि जुळवाजुळव सुरू असल्याने आता ही तक्रार करीत असल्याचे निपुंगे यांनी स्पष्ट केले.
क्लिक करा आणि वाचा- राज्यपाल भेटीत ठाकरे सरकारवर गंभीर आरोप; निलंबित आमदारांनी केल्या २ मागण्या
यांच्याविरोधात तक्रार
निपुंगे यांनी तत्कालीन आयुक्त परमवीर सिंग, सह पोलिस आयुक्त मधुकर पांडे, पोलिस उपायुक्त डॉ. स्वामी, सहायक आयुक्त रमेश धुमाळ, तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुक्तार अली बागवान, सोनवणे, अमोल फफाळे यांच्याविरोधात अॅट्रोसिटीसह कट रचणे व इतर कलमांनुसार निपुंगे यांनी तक्रार केली आहे.
आमचे इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी आणि विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम Dailyhunt Google News । Copyright © www.shasannama.in | All Rights Reserved.
Source link