[ad_1]
कधी कधी दुर्लक्ष केल्यामुळे पित्ताशय काढून टाकण्याची देखील वेळ येऊ शकते. कोणत्याही आजाराचे वेळेत उपचार झालेले कधीही चांगलं असतं. म्हणून चला तर जाणून घेऊया पित्ताशयातील स्टोन म्हणजे नेमकं असतं तरी काय? शिवाय या आजाराची कारणे, लक्षणे आणि उपचारांबद्दल सुद्धा माहिती जाणून घ्या.
गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे नेमकं काय असतं?

पित्ताशयाची थैली पोटाच्या उजव्या भागात बरोबर यकृताखाली एक लहान पेर फळाच्या आकाराचा एक अवयव असतो. त्याचे कार्य पित्त घट्ट करणं हे असते. हे पचनक्रियेमध्ये खूप मदत करते. हे यकृतमध्ये तयार केले होते, पित्ताशयात साठवले जाते आणि नंतर आतड्यात जाऊन अन्नाचे पचन करण्यास मदत करते. जर्नल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अमित अग्रवाल स्पष्ट करतात की पित्ताशयात अधिकचे स्टोन्स तेव्हा बनतात जेव्हा पित्तात जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल तयार होते. हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशनच्या (Harvard Health Publication) मते, 80 टक्के पित्त स्टोन्स हे कोलेस्ट्रॉलपासून बनतात. इतर 20 टक्के पित्त स्टोन्स हे कॅल्शियम सॉल्ट आणि बिलीरुबीनपासून बनतात.
पित्ताशयात स्टोन्स होण्याची कारणे काय आहेत?

पित्ता मध्ये खूप जास्त बिलीरुबीन
बिलीरुबीन हे एक केमिकल आहे हे जेव्हा आपले यकृत (liver) जुन्या लाल रक्त पेशी नष्ट करते तेव्हा बनते. काही विशिष्ट परिस्थितींमुळे जसं की रक्ताचे विकार यासारख्या परिस्थितीत यकृताला जितके बिलीरुबिन आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त तयार होऊ लागते. जेव्हा पित्ताशय जेव्हा अतिरिक्त बिलीरुबीन तोडू शकत नाही तेव्हा पिगमेंट स्टोन तयार होतात. हे कडक दगड बहुधा तपकिरी किंवा काळ्या रंगाचे असतात.
प्रमाणापेक्षा जास्त पित्त जमा होणं

आपले पित्ताशय निरोगी राहण्यासाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी वेळोवेळी पित्ताशयाची थैली रिक्त करणे आवश्यक असते. जर ही पित्ताशयाची थैली पित्त सामग्री रिक्त करण्यात अयशस्वी ठरली तर पित्त जास्त प्रमाणात जमा होऊ लागते, ज्यामुळे पित्ताशयात स्टोन तयार होऊ लागतात.
पित्ताशयात स्टोन झाल्याची लक्षणे काय आहेत?

पित्ताशयात स्टोन झाल्यामुळे पोटाच्या उजव्या भागात अधून-मधून वेदना होऊ शकतात. असं तेव्हा होतं जेव्हा आपण भरपूर प्रमाणात चरबीयुक्त फॅट असलेले खाद्यपदार्थ खातो. पण ही वेदना एक किंवा दोन तासांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. मळमळ, उलट्या, गडद रंगाची लघवी, मातीच्या रंगाचा मल, पोटात वेदना, बर्पिंग, अतिसार आणि आंबट ढेकर या लक्षणांचा समावेश आहे.
पित्त स्टोनचा उपचार कसा केला जातो?

जोपर्यंत आपल्याला तीव्र वेदना होत नाहीत तोपर्यंत आपल्याला पित्ताशयाची स्टोन्सचा उपचार करण्याची आवश्यकता भासणारच नाही असंही होऊ शकतं. कधी कधी हे स्टोन्स आपल्या लक्षात न येता लघवीतून स्वतःहून पडून देखील जाऊ शकतात. आपल्याला तीव्र वेदना होत असल्यास डॉक्टर तात्पुरता आराम पडण्यासाठी इंजेक्शन देईल, पण काही प्रकरणांत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देखील देऊ शकतात. क्वचित प्रसंगी डॉक्टर औषध लिहून देतात. जर शस्त्रक्रिया आपल्यासाठी धोकादायक असेल तर ड्रेनेज ट्यूब त्वचेच्या माध्यमातून पित्ताशयामध्ये ठेवली जाऊ शकते. इतर वैद्यकीय परिस्थितींचा उपचार करून जोखीम कमी होईपर्यंत तुम्ही ही पित्ताशयाच्या स्टोनची शस्त्रक्रिया पुढे ढकलू शकता.
(वाचा :- White Bread : पांढऱ्या ब्रेडमुळे कमकुवत होतंय तुमचं शरीर, ‘या’ गंभीर आजारांचा करावा लागेल सामना)
पित्ताशयाच्या स्टोन्सचे घरगुती उपचार

- एक निरोगी वजन राखण्याचा प्रयत्न करा
- अँटीइन्फ्लेमेटरी आहार घ्या
- नियमित व्यायाम करा
- वेगाने वजन कमी करणे टाळा
- तुमची इच्छा असल्यास तुम्ही व्हिटॅमिन सी, लोह आणि लेसिथिनने युक्त अशा काही पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेला आहार देखील घेऊ शकता. एका विश्लेषणामध्ये असे आढळले आहे की पित्ताशयाच्या स्टोन्सचा धोका कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि लेसिथिन प्रभावी आहेत. काही लोक पित्ताशयाची थैली साफ करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस वापरण्याचा सल्ला देतात.
(वाचा :- Quick weight loss: तरुणीने जेवणातून ‘हा’ पदार्थ बाद करून फक्त २ महिन्यांत घटवलं तब्बल 16 Kg वजन!)
पित्ताशयात स्टोन असल्यास या पदार्थांपासून राहा चार हात दूर

- शक्य तितके चरबीचे सेवन कमी करा
- मलविसर्जनाची क्रिया मजबूत करण्यासाठी व मल पातळ करण्यासाठी आपल्या आहारात जास्तीत जास्त फायबरचा समावेश करा
- कॅफिनयुक्त पेये, हाय फॅट डेअरी प्रोडक्ट्ससोबतच अतिसार होण्यास कारणीभूत ठरणारे पदार्थ टाळा
- दररोज हलके-फुलके खाद्यपदार्थ खा. हलके पदार्थ पचवणं शरीराला सोपं आहे
- पुरेसे पाणी प्या. दररोज सुमारे 6 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा
- आपणास वजन कमी करायचं असेल तर ते हळू हळू करा. प्रत्येक आठवड्यात 2 पौंडपेक्षा जास्त वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. वेगाने वजन कमी केल्याने पित्त स्टोन आणि इतर आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढू शकतो
- जर तुम्हाला पित्ताशयामध्ये स्टोन असल्याची शंका वाटत असेल पण कोणतीही लक्षणे दिसून येत नसतील तर उपचारांची आवश्यकता नाही. तरीही आपण जीवनशैलीमध्ये बदल करु शकता जेणेकरुन ही समस्या मोठी होऊ नये आणि नवी कोणती समस्या उद्भवू नये.
[ad_2]
Source link