[ad_1]
भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) न्यूझीलंडकडून पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंड (England) विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे
David Lloyed
एजबेस्टन : विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार असलेला भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) न्यूझीलंडकडून पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंड (England) विरुद्ध 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. पण त्यापूर्वी विराटसेनेने आजच्याच दिवशी एजबेस्टन इथे इंग्लंडसोबत खेळलेल्या टेस्टबाबत विचार करणे गरजेचे आहे. ज्यात कधीही अर्धशतकाहून अधिक धावा न करणाऱ्या एका खेळाडूने धडाकेबाज दुहेरी शतक ठोकत भारताला 78 धावांनी दमदार विजय मिळवून दिला होता.(Former England batsman David Lloyd hit Double Century Against India At Edgbaston test on this day)
भारत आणि इंग्लंड (India vs England) या संघामध्ये एजबेस्टनमध्ये 1974 साली 4 ते 8 जुलै दरम्यान ही कसोटी पार पाडली होती. सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघ 165 धावांच करु शकला. ज्यामध्ये सर्वाधिक धावा फारूख इंजीनियर यांनी (नाबाद 64) केल्या. तर कर्णधार अजित वाडेकर यांनी 36 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय गुंडप्पा विश्वनाथ यांनी 28 धावा केल्या. विशेष म्हणजे सुनील गावस्करसह चौघेजण तर शून्यावर बाद झाले. इंग्लंडकडूनमाइक हेंड्रिक यांनी अप्रतिम गोलंदाजी करत चार विकेट्स घेतल्या. तर ज्यॉफ आर्नोल्ड यांनी तिघा फलंदाजाना तंबूत धाडलं.
लॉयड यांचा दुसऱ्याच कसोटीत धमाका
इंग्लंडने पहिल्या डावात दोन विकेटच्या बदल्यात 459 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंड संघाने डाव घोषित केला.यामध्ये डेनिस एमिस आणि दुसरीच कसोटी खेळणाऱ्या डेविड लॉयड (David Lloyd) यांनी पहिल्या विकेटसाठी 157 धावांची भागिदारी केली. एमिस 79 धावा करुन बाद झाले. मग कर्णधार माइक डेनेस यांनी 100 धावा केल्या. माइक आणि लॉयड यांनी दुसऱ्या विकेटसाठी 211 दावांची भागिदारी केली. त्यानंतर चौथ्या नंबरच्या कीथ फ्लेचरने नाबाद 51 धावा केल्या. या सर्वांत सुरुवातीपासून मैदानावर असणारे डेविड लॉयड यांनी 214 धावांची नाबाद खेळी केली. भारताचा दुसरा डाव 216 धावांवर आटोपला आणि इंग्लंडने सामना 78 धावांनी आपल्या नावे केला.
लॉयड यांची कारकिर्द
दुसऱ्याच सामन्यात धमाकेदार दुहेरी शतक ठोकणाऱ्या लॉयड यांनी त्या सामन्यानंतर कधीच अर्धशतकाहून अधिकचा स्कोर करु शकले नाहीत. त्यांनी इंग्लंडसाठी 9 कसोटी सामने खेळले. ज्यात 42.46 च्या सरासरीने 552 धावा केल्या.
हे ही वाचा :
भारत विरुद्ध श्रीलंका सामने सुरु होण्याआधीच ‘या’ खेळाडूचे निलंबन, लाखो रुपयांचा दंड ठोठावत कारवाई
(Former England batsman David Lloyd hit Double Century Against India At Edgbaston test on this day)
[ad_2]
Source link