Home मनोरंजन genelia d’souza hot and bold looks: शाहिद-मीराच्या लग्नात जेनेलियाने घातला बोल्ड व सुंदर ड्रेस, नववधूला सोडून सर्वांची नजर खिळली रितेशच्याच पत्नीवर

genelia d’souza hot and bold looks: शाहिद-मीराच्या लग्नात जेनेलियाने घातला बोल्ड व सुंदर ड्रेस, नववधूला सोडून सर्वांची नजर खिळली रितेशच्याच पत्नीवर

0

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूझा (Genelia D’Souza) सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण आपल्या बोल्ड-ब्युटीफुल आणि बबली व्यक्तिमत्त्वामुळे ती नेहमीच चर्चेत असते. जेनेलिया पारंपरिक पोषाखांपासून ते वेस्टर्न कपड्यांपर्यंत, सर्वच पॅटर्नच्या आउटफिटमध्ये सुंदर व मोहक दिसते. म्हणूनच अभिनेत्रीच्या लुकमध्ये पारंपरिक आणि मॉडर्न लुकचे परफेक्ट मिश्रण पाहायला मिळतं.

जेनेलिया प्रत्येक पॅटर्नचे आउटफिट्स अतिशय सुंदरतेने आणि सहजरित्या कॅरी करते. पण पारंपरिक अवतारात तिचे रूप अधिकच खुलून दिसते. तिचा असाच काहीसा मोहक लुक बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूतच्या (Mira Rajput) लग्नसोहळ्यातही पाहायला मिळाला होता. या लग्नसोहळ्यामध्ये जेनेलियाने इतका सुंदर पोषाख परिधान केला होता की उपस्थितांच्या नजरा केवळ तिच्यावर खिळून राहिल्या होत्या. (फोटो सौजन्य -BCCL, इंडिया टाइम्स)
(कतरिनाने छोटा फ्रॉक घालून प्रियंकाला दिली तगडी स्पर्धा, क्युट लुकसमोर देसी गर्लचा बोल्ड अवतार पडला फिका)

​नववधूपेक्षाही जेनेलिया दिसत होती सुंदर

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची वेडिंग रिसेप्शन पार्टी २०१५मध्ये जल्लोषात पार पडली. या पार्टीमध्ये जेनेलियाने एकदम हटके स्टाइलने उपस्थिती दर्शवली होती. पार्टीसाठी जेनेलियाने प्रसिद्ध फॅशन डिझाइनर श्यामल आणि भूमिका यांच्या कलेक्शनमधील पेस्टल ग्रीन अनारकली सूटची निवड केली होती. हा ड्रेस तिच्यावर शोभून दिसत होता. एवढंच नव्हे तर जेनेलियाने आपल्या स्टायलिश लुकने नववधूलाही तगडी स्पर्धा दिल्याचं पाहायला मिळालं.

(अ‍ॅनिमल प्रिंट बिकिनीमधील बॉलिवूड अभिनेत्रींचा हॉट व बोल्ड लुक, फोटो पाहून चाहते झाले फिदा)

​जेनेलियाचे मोहक रूप

जेनेलिया डिसूझाने परिधान केलेला फिकट हिरव्या रंगाचा ड्रेस फ्लोरलेंग्थ थ्री पीस अटायर पॅटर्नमधील होता. यामध्ये ए-लाइन कुर्त्यासह मॅचिंग दुपट्टा आणि बॉटमचा समावेश होता. आउटफिट तयार करण्यासाठी नेट-चार्मिस सॅटन, सेनील, जॉर्जेट मिक्स शिफॉन यासारख्या फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता. ड्रेसमध्ये पूर्णतः रेशीमच्या धाग्यांपासून वर्क करण्यात आलं होतं. या ड्रेसच्या कमरेच्या भागावर आकर्षक पद्धतीचे विणकामही करण्यात आले होते. यामुळे आउटफिटच्या हेमलाइनला फ्री-फ्यूज लुक मिळाला होता.

(आकाश अंबानीच्या पार्टीत या सौंदर्यवतीमुळे शाहरुखचा जीव झाला येडापिसा, तिच्याकडेच पाहत होता एकटक)

​ड्रेसचे डिझाइन होतं आकर्षक

शीयर लुकिंग आउटफिटमध्ये टूल फॅब्रिकपासून राउंड नेकलाइन तयार करण्यात आली होती. ड्रेसमध्ये फुल स्लीव्ह्ज जोडण्यात आले होते. आउटफिटला बोल्ड लुक मिळावा यासाठी गळ्याच्या भागावर वजनदार एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलं होतं. यामध्ये थ्री डी डिटेलिंगसह फुल-पानांचे डिझाइन तयार करण्यात आले होते. ड्रेसचे बॅकलेस डिझाइन प्रचंड बोल्ड होते. ज्यामध्ये आरपार दिसणाऱ्या कपड्यांवर वजनदार एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले होते. या ड्रेसमध्ये जरी-जरदोजी एम्ब्रॉयडरी असणाऱ्या दुपट्ट्याचा समावेश होता. दुपट्ट्यासाठी ऑर्गेंझा फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता.

(सोनम कपूरच्या मेंदी सोहळ्यात करिश्माने घातला होता सुंदर लेहंगा, मोहक सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ)

​परफेक्ट मेकअप

जेनेलियाने या ड्रेसवर कोणत्याही प्रकारची वजनदार ऑक्सिडाइझ्ड ज्वेलरी परिधान करणं टाळलं होतं. या उलट तिनं डायमंड मेड ड्रॉप डाउन ईअररिंग्ज घातले होते. मेकअपसाठी तिनं लाइट टोन फाउंडेशनसह चमचमणारे आयशॅडो, बेसिक लाइनर, गुलाबी रंगाचे लिपस्टिक, बीमिंग हायलाइटर अशा ब्युटी प्रोडक्टचा वापर केला होता. तर मेसी लुक देत साइड पार्टेड बन हेअरस्टाइल केली होती.

(माधुरी दीक्षितने परिधान केला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, तिच्यासमोर करीना कपूरचा हॉट लुकही दिसेल फिका)

​मीराचा लुक पडला फिका

एकीकडे जेनेलिया डिसूझाने आपल्या बोल्ड लुकने उपस्थितांचे हृदय जिंकलं. तर दुसरीकडे तिच्यासमोर मीरा राजपूतचाही लुक फिका पडल्याचं दिसत होतं. आपल्या वेडिंग रिसेप्शनसाठी मीरा राजपूतने प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला टू पीस सेट परिधान केला होता. ज्यामध्ये क्रॉप टॉपसह बॉलगाउन स्कर्टचा समावेश होता. मीराचे हे आउटफिट ब्लिंगी पॅटर्नमधील होतं, जे तिच्यावर शोभून दिसत होते. पण जेनेलियाच्या लुकसमोर तिचा अवतार एकदम फिका पडला होता.

(आलिया भटने बहिणीच्या लग्नात घातला बोल्ड डिझाइनर ब्लाउज, सर्वजण तिलाच पाहत होते एकटक)

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here