[ad_1]
आकाश चोप्राने त्याच्यामते 21 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट कसोटी फलंदाज असणाऱ्या खेळाडूंची यादी जाहिर केली आहे. यामध्ये केवळ दोनच भारतीयांना स्थान देण्यात आलं आहे.
1/7
प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने त्याच्यामते 21 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट कसोटी फलंदाजाची यादी जाहिर केली आहे.
यामध्ये दोघा भारतीयांसह एकूण 6 फलंदाजाचा समावेश आहे. चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये या फलंदाजाची
यादी जाहिर केली. विशेष म्हणजे यामध्ये विराट कोहली (Virat Kohli), स्टीव स्मिथ, केन विलियमसन या दिग्गजांना स्थान देण्यात आलेले नाही.
2/7
या यादीत आकाशने सर्वात पहिल्या स्थानी भारताचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) याचं नाव ठेवलं आहे. द्रविडने
124 टेस्टमध्ये 52 च्या सरासरीने 28 शतकं ठोकत 9 हजार 966 धावा केल्या आहेत. द्रविडबद्दल बोलताना आकाश म्हणाला,’द्रविड एक महान फलंदाज आहे.
त्याने रावळपिंडीमध्ये ठोकलेल्या 270 धावा, एडिलेडचे दुहेरी शतक, ईडन गार्ड्न्समध्ये लक्ष्मणसोबतची भागिदारी ही सर्व उदाहरण अप्रतिम आहेत.
तसेच सलग 4 टेस्टमध्ये शतक ठोकणारा राहुल एकमेव भारतीय आहे.”
3/7
द्रविडनंतर आकाशने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचे (Jack kallis) नाव घेतले. कॅलिसने
123 कसोटी सामन्यात 59 च्या सरासरीने 38 शतक ठोकत 10 हजार 660 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेत फलंदाजी करणे अवघड असतानाही कॅलिसने
घरगुती मैदानात 62 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यावरुन त्याच्या फलंदाजीचा अंदाज येऊ शकतो असं चोप्रा म्हणाला.
4/7
दिग्गज ऑस्ट्रेलिया संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉटिंग याचा नंबर आकाशने तिसऱ्या स्थानावर ठेवला आहे.
रिकीबद्दल बोलताना आकाश म्हणाला, ”रिकीने कॅलिसप्रमाणेच घरगुती मैदानात अप्रतिम कामगिरी केली असून त्याची सरासरी देखील 60 ची राहिली आहे.त्ायने
19 शतक ठोकली आहेत. 130 सामन्यांत 53 च्या सरासरीने रिकीने 10 हजार 968 धावा केल्य़ा आहेत.
5/7
या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार यष्टीरक्षक कुमार संगकारा (Kumar sangkara) याचं नाव चोप्राने घेतलं आहे. चोप्रा म्हणाला संगकाराचे परदेशांतील सरासरी 49 ची राहिली आहे. 21 व्या शतकात सर्वाधिक धावा करणारा कुमार दुसरा फलंदाज आहे.त्याने श्रीलंका संघासाठी 130 टेस्टमध्ये 58 च्या सरासरीने 38 शतकांसह 12 हजार 226 धावा केल्या आहेत.
6/7
महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) नाव आकाशने 5 व्या नंबरवर ठेवले आहे. चोप्राने सांगितलं की,
”सचिनने अनेक वर्ष भारताची फलंदाजी सांभाळली. परेदेशात अनेक रेकॉर्ड केले. पण 21 व्या शतकातील क्रिकेट बदलल्याने मी अशा ठिकाणी तेंडुलकरला स्थान दिलं आहे.”
7/7
आकाश चोप्राने या यादीत सर्वात शेवटच्या आणि सहाव्या स्थानावर इंग्लंडचा माजी सलामीवीर
एलेस्टेर कुकचे (A Cook) नाव घेतले. कुकने 21 व्या शतकात सर्वाधिक कसोटी धावा केल्या आहेत. त्याने 45 च्या सरासरीने तब्बल 12 हजार 472 धावांचा
डोंगर रचला आहे.
[ad_2]
Source link