Thursday, March 28, 2024
Homeक्रीडाCopa America 2021 : नेमारची जादू आणि ब्राझील अंतिम सामन्यात दाखल, पेरु...

Copa America 2021 : नेमारची जादू आणि ब्राझील अंतिम सामन्यात दाखल, पेरु संघावर अप्रितम विजय, पाहा व्हिडीओ | Neymars Brazil Team Beats Peru in Semi Final and enters In Copa America 2021 Final

[ad_1]


कोपा अमेरिका 2021 ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट मिळाला असून नेयमारच्या ब्राझीलने पेरुला नमवत अंतिम सामना गाठला आहे.

Copa America 2021 : नेमारची जादू आणि ब्राझील अंतिम सामन्यात दाखल, पेरु संघावर अप्रितम विजय, पाहा व्हिडीओ

ब्राझील आणि पेरु यांच्या सामन्यातील एक क्षण

रिओ : अमेरिकन देशातील सर्वात मानाची फुटबॉल स्पर्धा म्हणजे कोपा अमेरिका चषक (Copa America Cup 2021). अमेरिकी देशात सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात खेळणारा पहिला संघ समोर आला आहे. प्रसिद्ध फुटबॉलपटू नेयमारच्या (Neymar) ब्राझील संघाने पेरु संघाला (Brasil vs peru)  सेमीफायनलच्या सामन्यात मात देत अंतिम सामन्यात धडक घेतली आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात केवळ एकच गोल झाला. नेयमारच्या जादुई खेळीमुळे ब्राझीलने एकमेव गोल केला आणि सामनाही 1-0 ने खिशात घातला.

सामन्यात ब्राझीलच्या स्ट्रायकर्सने सुरुवातीपासूनच आक्रमण करत पेरु संघाच्य़ा डिफेन्सला व्यस्त ठेवलं. त्यामुळे त्यांना जास्त एटॅक करता आले नाही. सामन्याच्या 34 व्या मिनिटाला ब्राझीलने पहिला गोल केला. नेयमारने जादुई ड्रीबलिंग करत एक अप्रितम पास लुकास पॅकिएस्टा (Lucas Paqueta) याला दिला. लुकासनेही सहज बॉल गोलपोस्टमध्ये टाकत ब्राझीलला पहिला गोल मिळवून दिला.  दुखापतीमुळे 2019 ची कोपा अमेरिका स्पर्धा खेळू न शकलेल्या नेयमारने यंदाच्या सीझनमध्ये अप्रतिम कामगिरी केली असून तो चषकही जिंकवून देईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

अंतिम सामन्यात मेस्सी विरुद्ध नेयमार?

एकीकडे पेरुला नमवत ब्राझीलचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. तर दुसरीकडे अर्जेंटीना आणि कोलंबिया (Argentina vs Colombia) यांच्यात 7 जुलैला होणाऱ्या सेमीफायनल सामन्यातील एकजण अंतिम सामन्यात पोहचणार आहे. जर यावेळी अर्जेंटीनाचा संघ जिंकला तर कर्णधार लिओनल मेस्सी (Lionel Messi) आणि ब्राझीलचा नेयमार हे दोघे अंतिम सामन्यात भिडतील. मेस्सी आणि नेयमार हे दोघेही फुटबॉल जगतातील अव्वल दर्जाचे खेळाडू असून अनेक वर्ष बार्सिलोना क्लबमधून एकत्र खेळले आहेत.

हे ही वाचा :

Copa America : मेस्सीचा एका मागोमाग एक गोल, अर्जेंटीनाचा बोलिवियावर दमदार विजय, पाहा VIDEO

Euro 2020 : रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ पराभूत, स्पर्धेतून बाहेर, मैदानावर रोनाल्डोसह प्रतिस्पर्धीही भावूक

Euro 2020 : बेल्जियमला मात देत इटली विजयी, सेमीफायनलमध्ये स्पेनशी होणार सामना

(Neymars Brazil Team Beats Peru in Semi Final and enters In Copa America 2021 Final)



[ad_2]

Source link

Shasannama News
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News