[ad_1]
Monsoon Update: आज पुणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळणार आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे.
पुणे, 06 जुलै: मागील काही दिवसांपासून राज्यासह देशात मान्सून (Monsoon) काहीसा मंदावला आहे. दरम्यानच्या काळात केवळ बिहार राज्य वगळता अन्य राज्यात पावसानं दडी मारली आहे. 8 जुलै नंतर संपूर्ण देशात मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसह देशात मान्सून वापसीचे संकेत मिळत आहेत. पुढील तीन दिवस राज्यात पावसाची स्थिती असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
आज पुणेसह राज्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळणार आहे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. आज पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
Good News
Severe weather warnings issued by IMD today for coming 5 days;6-10July
First 3 days TS⛈️ warnings mostly,except in Konkan.
D4,D5 could be heavy rainfall in Konkan & Interior too.Heavy to vry hvy could be on D5 in S Konkan.#mumbairain could also see revival.@RMC_Mumbai pic.twitter.com/ETQHjWUQFc
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 6, 2021
8 जुलैला विदर्भात मुसळधार पाऊस
विदर्भातून मान्सून गायब झाल्यानं तापमान वाढलं होतं. याठिकाणी सरासरी तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आलं होतं. आता पुन्हा विदर्भातील तापमानाचा पारा घटला आहे. आज विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर दोन दिवसांनी म्हणजेच 8 जुलै रोजी विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 8 जुलै रोजी विदर्भात हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे हवामान तज्ज्ञांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Under the influence of these conditions:
(i) Scattered to widespread rainfall with isolated heavy falls over Central India (Madhya Pradesh, Vidarbha, Chhattisgarh) from 8th July onwards and isolated very heavy rainfall also very likely over Vidarbha and Chhattisgarh on 8th July. pic.twitter.com/A67uWmue97
— India Meteorological Department (@Indiametdept) July 6, 2021
हेही वाचा-या लोकांना डेल्टा व्हेरियंटचा सर्वाधिक धोका; लसीच्या प्रभावाबाबत मोठा खुलासा
आजपासून पुढील तीन दिवस राज्यात कोकण वगळता अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर 9 आणि 10 जुलै रोजी मात्र कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 10 जुलै रोजी दक्षिण कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून गायब झालेला मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता काहीशा दूर होणार आहेत.
[ad_2]
Source link