Thursday, March 23, 2023
Homeक्रीडाM S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं स्टम्पिंग...

M S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं स्टम्पिंग करायचा, धोनीसाठी आयसीसीचा खास Video | ICC Wish M S Dhoni Happy Birthday With Uploading hes best stumping videos

[ad_1]


महेंद्र सिंग धोनीचा आज वाढदिवस (Mahendra Singh Dhoni Birthday) असून धोनीने आज 41 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. धोनीला जगातील सर्वच मान्यवरांपासून ते त्याचे चाहते शुभेच्छा देत आहेत. आयसीसीने ही धोनीला हटके शुभेच्छा देत एक अप्रतिम व्हिडीओ पोस्ट केला आहे.

M S Dhoni Birthday : स्टम्पच्या मागून मॅच फिरवायचा, वीजेच्या वेगानं स्टम्पिंग करायचा, धोनीसाठी आयसीसीचा खास Video

M S Dhoni Stumpings

मुंबई : भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वांत यशस्वी कर्णधार, महान यष्टीरक्षक खालच्या फळीतील बेस्ट बॅट्समन अशा एक न अनेक उपमांचा धनी असणाऱ्या महेंद्र सिंग धोनीचा (MS Dhoni) आज वाढदिवस (Mahendra Singh Dhoni Birthday). 7 जुलै, 1981 रोजी रांची इथे जन्माला आलेल्या धोनीने आपल्या मेहनतीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आणि मग 2007 चा टी-20 विश्वचषक, 2011 चा एकदिवसीय विश्वचषक, 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही आयसीसी ट्रॉफी मिळवून दिल्या. 2019 सालच्या विश्वचषकातील सेमी फायनचा सामना धोनीचा कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. 15 ऑगस्ट 2020 रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीचे आजही तितकेच चाहते असून त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (ICC Wish M S Dhoni Happy Birthday With Uploading hes best stumping videos)

धोनीने आपल्या तुफान फलंदाजीने अनेक सामने भारताला जिंकवून दिले. पण त्याहून अधिक सामने हे त्याने स्टम्पच्या मागे यष्टीरक्षक म्हणून उभा असताना जिंकवून दिले. भारताला विकेटची अत्यंत गरज असताना आपल्या निवडक गोलंदाजाला बोलिंग द्यायची आणि मग स्टम्पिगने किंवा कॅचआऊट करुन भारताला विकेट मिळवून द्यायचं हे धोनीचं ठरलेलं काम…त्याच्या स्टम्पिगचा वेग हा अगदी वीजेच्या वेगाप्रमाणे अशी उपमा धोनीला दिली गेली होती. अशाच त्याच्या निवडक स्टम्पिग्सचे व्हिडीओ आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) ट्वीट करत धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

धोनीची क्रिकेट कारकिर्द

धोनीने 2004 साली बांग्लादेश संघाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघातून पदार्पण केले. 350 एकदिवसीय सामन्यात धोनीने 10 शतकं आणि 73 अर्धशकांच्या मदतीने 10 हजार 773 धावा कुटल्या. न्यूझीलंडविरुद्धचा 2019 च्या विश्वचषकातील सेमीफायनलमधील सामना धोनीचा अखेरचा सामना ठरला. कसोटी सामन्यांचा विचार करता धोनीची कारकिर्द कमी असली तरी रोमांचक होती. धोनीने खेळलेल्या 90 कसोटीत 38.09 च्या सरासरीनं 4 हजार 876 रन्स केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 6 शतकांसह 33 अर्धशतकं आहेत. तर जगातील पहिला टी-20 विश्वचषक जिकंणाऱ्या धोनीने 98 टी-20 सामन्या 1617 धावा केल्या. ज्याच 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

हे ही वाचा –

M S Dhoni Birthday : क्रिकेटपटूंकडून धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव, विराटचं कॅप्शन मन जिंकणारं

शुभमनच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर, वाचा किती काळ गिलला संघाबाहेर रहावे लागणार

भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच ‘हा’ दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा

(ICC Wish M S Dhoni Happy Birthday With Uploading hes best stumping videos)

 [ad_2]

Source link

Shasannama News
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News