Home महाराष्ट्र करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; बीएमसीनं केली 'ही' तयारी

करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; बीएमसीनं केली 'ही' तयारी

0

[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी,

मुंबईत सध्या करोना नियंत्रणात असला तरी तिसऱ्या लाटेची भीती वर्तविण्यात येत आहे. तशी परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच मुंबई महापालिकेकडून वैद्यकीय सुविधा पुरविण्याबाबत सुसज्जता सुरू केली आहे. ऑगस्टमध्ये संभाव्य तिसरी लाट येईल, असा ठोकताळा मांडला जात आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून महापालिकेने आठ हजार खाटा उपलब्ध होतील, अशी तजवीज करायचे ठरवले

आहे. करोनासंदर्भात आरोग्यतज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात आहे. त्यादृष्टीने महापालिकेने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे ठरविले आहे. सध्या शहरात करोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच बाधितांचे प्रमाण २ टक्के एवढे आहे. संपूर्ण मुंबईत दररोज किमान ३० हजारांपर्यंत करोनाच्या चाचण्या होत आहेत. मात्र, सणासुदीचे दिवस आणि इतर भागांतून मुंबईत ये-जा करणाऱ्यांची संख्या पाहता महापालिकेने सावध धोरण कायम ठेवले आहे. सणवारांच्यावेळी गर्दी उसळून करोनास हातभार लागू नये म्हणून महापालिकेकडून काळजी घेतली जात आहे. यदाकदाचित आल्यास वैद्यकीय उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, हे पाहिले जात आहे. त्यासाठीच आठ हजार खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here