भास्कर जाधव यांच्या ‘त्या’ कृतीवर शिवसेनेतून आली पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत म्हणाले….

0
109

मुंबई – शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीवर शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया आली आहे. प्रत्येक घडामोडींवर रोखठोक भाष्य करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. 

संजय राऊत म्हणतात.. “भास्कर जाधवांबाबत मी पाहिलं नाही, वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील. पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि मुख्यमंत्री आणि सरकार हे करते आहे. तसेच घडलेल्या प्रकरणावर स्वतः हा भास्कर जाधवच भाष्य करतील.’ असं राऊत म्हणाले. 

चिपळूणच्या बाजारपेठेत काल नेमकं काय घडलं? 

कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. काहींचे संसार डोळ्यादेखत वाहून गेले. आणि याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण मध्ये गेले होते.

मुख्यमंत्री व्यापाऱ्यांशी चर्चा करत असतानाच एका महिलेने हंबरडा फोडत तिचे दुःख मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. “पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचले. त्यात सर्वकाही वाहून गेले. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो’, अशी विनवणी तिने केली. मुख्यमंत्र्यांनीही या महिलेपुढे हात जोडत मदतीची ग्वाही दिली.

मात्र यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या भास्कर जाधव यांनी या महिलेच्या मुलालाच आईला समजाव असे मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितले. तसेच पुढे जताना त्यांनी या महिलेच्या मुलाला उद्या भेट असेही दमदाटी केल्याच्या स्वरात सांगितल्याचे कॅमेरांनी टिपले.

Source link