उरुळी कांचन – मागील पंधरा दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे पूर्व हवेलीतील उरुळी कांचनसह परिसरात चिकुनगुनिया व डेंग्यूच्या रोगांनी डोके वर काढले आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता डेंग्यूचा आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंग्यू नियंत्रणात असला तरी करोनाशी लढा देताना नागरिकांना डेंग्यूपासून देखील काळजी घ्यावी लागणार आहे.