बंगळुरू – कर्नाटकातील भाजप सरकारचे नवे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्माई यांनी आज सूत्रे स्वीकारली. राजभवनावर झालेल्या एका साध्या समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना अधिकार पदाची शपथ दिली.
येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची निवड होणार या विषयी कमालीचा सस्पेन्स निर्माण झाला होता. पण काल रात्री झालेल्या बोम्माई यांच्या निवडीनंतर हा सस्पेन्स संपला. बोम्माई हे उत्तर कर्नाटकातील लिंगायत नेते आहेत. त्यांच्या निवडीला येडियुरप्पांचीही संमती मिळाली आहे.
जाणून घेऊयात बसवराज बोम्माई यांच्याबाबत ५ खास गोष्टी
- बसवराज बोम्माई यांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी आहे. ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.
- बोम्माई यांनी पुण्यातील टाटा मोटर्स येथे ३ वर्ष नौकरी केली. यानंतर त्यांनी स्वतःचा उद्योग सुरु केला.
- बोम्माई हे उत्तर कर्नाटकातील लिंगायत नेते आहेत. ते १९९८ मध्ये प्रथम कर्नाटक विधान सभेवर निवडून गेले. २००८ मध्ये त्यांनी जनता दलाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.
- त्यांनी माजी मुख्यमंत्री बी एच पटेल यांचे राजकीय सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
- त्यांनी कायदा, संसदीय कार्य व कायदे आणि जलसंपदा मंत्रीपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.