जयंत पाटील यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

0
109

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना उपाचारांसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना जयंत पाटील यांना त्रास सुरू झाला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून रूग्णालयाकडे रवाना झाले.  त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल कऱण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

जयंत पाटील यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह जितेंद्र आव्हाड, सतेज पाटील व अन्य काही मंत्री देखील असल्याची माहिती समोर येत आहे.  तसेच, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, त्यांची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Source link