Ganpatrao Deshmukh Death | जेष्ठ नेते, सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन

0
149

पुणे:  सोलापूरमधील सांगोला विधानसभेचे (Sangola Assembly constituency) माजी आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh Death) यांचं निधन झालं आहे. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये  वयाच्या 94 व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गणपतराव देशमुख हे  तब्बल 11 वेळा आमदार होते. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव होता. त्यांच्या निधनामुळे राजकीय विश्वावर शोककळा पसरली आहे.

विक्रमवीर आमदार

गणपतराव यांनी तब्बल 54 वर्ष सांगोला विधानसभा मतदार संघांच प्रतिनिधित्व केलं. एकाच मतदारसंघातून 11 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम देशमुख यांनी केला. गणपतराव यांच्या निधनाने राज्यातील राजकारणातला ध्रुवतारा हरपल्याची भावना जनसामांन्यातून व्यक्त केली जात आहे. 

गणपतराव देशमुख यांच्याबद्दल थोडक्यात…

1950-54 शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत विद्यार्थी सभेचा कार्यकर्ता. .

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभाग व अनेक वेळेस कारावास. .

1962- पासुन शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती व चिटणीस मंडळाचे सदस्य..

1965- अन्नधान्य चळवळीत येरवडा कारागृहात स्थानबद्ध. .

1969-1975 — सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शेतकरी सभा..

1969– संस्थापक अध्यक्ष,  सांगोले तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, या संस्थेचे सांगोले येथे न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आणि विज्ञान महाविद्यालय सांगोला. .
1972-75 — सदस्य, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक मंडळ मुंबई. .

1975– आणीबाणी च्या काळात खटला आणि तुरूंगवास. .

आटपाडी येथील माण गंगा सहकारी साखर कारखाना व सांगोला तालुक्यातील सांगोले तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत सक्रिय सहभाग. .

संस्थापक,  शेतकरी सहकारी सुतगीरणी मर्यादित सांगोले. .

संस्थापक , शेतकरी महिला सहकारी वस्ञनिर्माण सूतगिरणी मर्या. सांगोले .

महाराष्ट्र राज्य पाणी परिषदेचे अध्यक्ष, राज्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळावे म्हणून प्रयत्न ,

सांगोले तालुका पाणलोट विकास क्षेञामध्ये अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न. .

सांगोले शाखा पाटबंधारे प्रकल्प क्रमाक्र  4  व 5 ,टेंभू व म्हैसाळ प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी तसेच कृष्णा खोरे महामंडळाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न. .

रोजगार हमी योजनेखाली बोर, डाळिंब व अन्य फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी व विक्रीसाठी सहकारी फळबाग उत्पादक शेतकरी संघ स्थापन करून देशात व परदेशात फळ विक्री ची व्यवस्था करण्यात पुढाकार. …

महाराष्ट्र विधानसभा सदस्य

1962-67, 1967-72, 1974-78, 1978-80, 1980-85, 1985-90, 1990-95, 1999-2004, 2004-2009, 2009-2014,  2014  ते 2019  सदस्य होते.   

2014  साली  निवडून येवून जागतिक रेकॉर्ड केले.

विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र राज्य विधानसभा–1977. .

पुलोद शासन– जुलै 1978 ते फेब्रुवारी 1980 पर्यंत कृषी,  ग्रामविकास आणि विधी व न्याय खात्याचे मंत्री. ..

पुरोगामी लोकशाही आघाडी शासन — 19 ऑक्टोबर 1999 ते मे 2002 पर्यंत पणन , रोजगार हमी योजना मंञी,  मे  2002 मध्ये मंत्री पदाचा राजीनामा दिला. .

विधान सभेचे हंगामी अध्यक्ष — मार्च 1990 , नोव्हेंबर 2004 , आणि पुन्हा तिसर्‍या वेळेस 9 नोव्हेंबर 2009 रोजी महाराष्ट्राचे राज्यपालांकडून हंगामी अध्यक्ष म्हणून निवड..

शासकीय समिती सदस्य– 1980-82 महाराष्ट्र विधान मंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष. विधान मंडळाच्या अंदाज,  लोकलेखा, कामकाज सल्लागार,  उप. विधान,  सार्वजनिक उपक्रम व विनंती अर्ज इत्यादी समित्यांचे सदस्य