मुंबई: मालवणी येथे इमारतीवर इमारत कोसळली; ११ जणांचा मृत्यू

0
47

मुबंईः (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन

मुंबईतील मुसळधार पावसामुळं मालाडमधील एका इमारतीचा भाग कोसळला आहे. बुधवारी रात्री उशिरा मालाड मालवणी भागात एक इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी आहेत. (mumbai malwani building collapse)

मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एक दुमजली घर अचानक नजीकच्या दुमजली इमारतीवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १७ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत ७ जणं गंभीर जखमी आहेत. तसंच, अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य अजूनही सुरु आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळं ही दुर्घटना घडली आहे. अग्निशमन दल व पोलिसांचे सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम चालु आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

ही दुर्घटना ११च्या सुमारास घडली असून सुरुवातीला एक चार मजली इमारती कोसळली. या घरात ७ जण राहत होते. ही इमारत कोसळल्यानंतर त्याच्या पाठोपाठ एत अशी दोन घरं कोसळली. यातील एक घरात ७ जणं राहत होते. त्यातील पाच जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घरातील २ लहान मुलांनाही बचावण्यात आलं आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

Source link