Sunday, July 25, 2021
Homeमनोरंजन'झोपण्यापूर्वी सॉरी बोला’ अभिषेकने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं मोठ सीक्रेट, तुम्हालाही मिळेल...

‘झोपण्यापूर्वी सॉरी बोला’ अभिषेकने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं मोठ सीक्रेट, तुम्हालाही मिळेल मदत

प्रेमाच्या नात्यामध्ये छोटे-मोठे वादविवाद, भांडणे होत असतात. डोके शांत झाल्यानंतर पार्टनर एकमेकांना सॉरी बोलून आपापसातील वाद संपुष्टात आणतात. केवळ सॉरी म्हटल्यानं जोडीदाराचा राग शांत करण्यास मोठी मदत मिळू शकते. नात्यातील संवाद टिकवून ठेवण्यासाठी बहुतांश जोडपी ही पद्धत अवलंबतात. पण दोघांमध्ये टोकाचे वाद झाल्यास नेमकं काय करावे? कारण अशा वेळेस बहुतांश लोक दीर्घ काळ अबोला धरतात.

काही लोकांना वाटतं की केवळ माफी मागून काय उपयोग होणार आहे? माझी चूक नाही तर मी का माफी मागावी? पण जर तुम्ही मनापासून माफी मागितली तर नक्कीच तुमच्यातील वाद, तणाव लगचेच संपुष्टात येऊ शकतात. अभिषेक बच्चननंही (Abhishek Bachchan) सांगितलं होतं की, केवळ सॉरी (Sorry) म्हटल्यानं तुमचे नातेसंबंध फार सुंदर होऊ शकते. (फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)

​​’झोपण्यापूर्वी सॉरी बोला’

'झोपण्यापूर्वी सॉरी बोला’ अभिषेकने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं मोठ सीक्रेट, तुम्हालाही मिळेल मदत

अभिषेक बच्चनने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आपल्या लव्ह लाइफबाबत बरेच सीक्रेट सांगितले होते. अभिषेकनं सांगितले होते की, आजही त्यांच्या घरात आईसमोर वडील अमिताभ बच्चन यांचं काहीही चालत नाही. यानंतर अभिनेत्याने पुढे असंही म्हटलं की, ‘दिवसाच्या शेवटी आपल्या बायकोचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या आणि कारण असो किंवा नसो रात्री झोपण्यापूर्वी तिला सॉरी म्हणा. असे केल्यास आपण फार आनंदी राहाल. कारण पत्नी नेहमीच बरोबर असते’.

जे कपल अहंकारामुळे एकमेकांपासून दूर होतात, अशा लोकांसाठी अभिषेकनं दिलेला सल्ला मोलाचा ठरू शकतो. कळत-नकळत चुका सर्वांकडूनच घडतात, पण माफी मागणं पुरुषांना अवघड जातं आणि याबाबतीत महिला फारच भावनिक असतात. प्रत्येक गोष्ट त्या मनाला लावून घेतात. पण सॉरी न म्हणण्याच्या निर्णयामुळे तुमचं नातं पूर्णतः बिघडू शकते, हे लक्षात घ्या.

​​मनापासून माफी मागा

'झोपण्यापूर्वी सॉरी बोला’ अभिषेकने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं मोठ सीक्रेट, तुम्हालाही मिळेल मदत

जोडीदाराशी भांडण झाल्यानंतर बऱ्याचदा लोक सॉरी म्हणतात, पण त्यांच्यातील वाद काही केल्या मिटत नाहीत. कारण माफी मागण्याची एक योग्य पद्धत असणं देखील आवश्यक आहे. पार्टनरवर उपकार केल्यासारखे माफी मागितली तर त्याचा अर्थ शून्यच असतो. वाद अधिक वाढू नयेत यासाठी छोटी-मोठी चूक झाल्यानंतर जोडीदाराला मिठी मारा आणि सॉरी म्हणावे.

कित्येकदा किरकोळ कारणांमुळे वाद होतात. पण छोट्या वादाचे मोठ्या भांडणात रूपांतर होण्यास वेळ लागत नाही. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जोडीदाराला सॉरी म्हणायला काहीच हरकत नसावी.

​नात्यात नसावा अहंकार

'झोपण्यापूर्वी सॉरी बोला’ अभिषेकने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं मोठ सीक्रेट, तुम्हालाही मिळेल मदत

आपण अनेकदा ऐकले असेलच की काही जोडपी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पारंगत असतात. उदाहरणार्थ कोणी स्वादिष्ट स्वयंपाक तयार करतात, तर काहींचा राग पटकन शांत होतो. तसंच काही जण सॉरी बोलून वाद संपुष्टात आणण्याचाही प्रयत्न करतात. यामुळे दोन व्यक्तींमधील नाते अधिक दृढ होण्यास मदत मिळते. कारण जोडीदार अहंकाराऐवजी आपल्या प्रेमाला व नात्याला अधिक महत्त्व देताना दिसतो. एकमेकांच्या सवयी योग्य पद्धतीनं सांभाळून, जुळवून घेतल्यास नात्यात प्रेम वाढू लागते. नात्यात अंतर, दुरावा वाढू न देणे; ही जबाबदारी दोघांचीही असते, हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे.

​स्वतःमध्ये करा सकारात्मक बदल

'झोपण्यापूर्वी सॉरी बोला’ अभिषेकने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं मोठ सीक्रेट, तुम्हालाही मिळेल मदत

एखाद्या नात्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात आवश्यकता नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर आपण पूर्णतः अयोग्य आहात. कारण नात्यामध्ये प्रेम, संवाद, माया टिकवून ठेवण्यासाठी स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवणेही गरजेचं असते. कोणत्याही नात्यामध्ये प्रेम शेवटपर्यंत निभावणे ही बाब महत्त्वपूर्ण आहे. यासाठी स्वतःमध्ये वेळेनुसार बदल करणं आवश्यक आहे.

​वाद संपुष्टात आणा

'झोपण्यापूर्वी सॉरी बोला’ अभिषेकने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं मोठ सीक्रेट, तुम्हालाही मिळेल मदत

दोन व्यक्तींचे स्वभाव एकमेकांपासून नक्कीच भिन्न असू शकतात, पण नात्यासाठी एकरूप होणं गरजेचं असते. एकमेकांच्या आवडीनिवडी, स्वभाव स्वीकारल्यास तुमच्यातील नाते अधिक मजबूत होऊ शकते. तसंच छोटी-मोठी चूक, वाद, भांडण झाल्यानंतर पार्टनरला किमान एकदा तरी सॉरी म्हणावे. यामुळे वादही संपतील आणि तुमच्यातील प्रेम सुद्धा वाढेल. कारण सॉरी म्हटल्याने तुमचे कधीही कोणतंही नुकसान होणार नाही, हे लक्षात घ्या.

Source link

'झोपण्यापूर्वी सॉरी बोला’ अभिषेकने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं मोठ सीक्रेट, तुम्हालाही मिळेल मदत
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News