बोरगाव ता माळशिरस येथील कै.धनाजी अनंता साठे यांच्या प्रेताची विटंबना करणाऱ्या दोषी आरोपींवर अॅक्ट्रोसिटि कायद्यानुसार कार्यवाही करावी – दत्ता जाधव

0
72

पुणे (प्रतिनिधी) | शासननामा न्यूज ऑनलाईन

बोरगाव ता.माळशिरस जि. सोलापूर येथील मातंग समाजाचे कै, धनाजी साठे यांच्या मृतदेहाची जाणून बुजून विटंबना करण्यात आली व अंत्यसंस्कार करण्यास मनाई करण्यात आली यामधे दोषींवर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार संपूर्ण दोषींवर कारवाई होऊन त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.

आलवसा फाउंडेशन च्या वतीने आज विभागीय आयुक्त मा सौरभ जी राव यांना बोरगाव ता. माळशिरस येतील घटनेतील दोषी वर कडक अट्रॉसिटी ऍक्ट कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी आलवसा फाउंडेशन चे अध्यक्ष दत्ताभाऊ जाधव नेते जितेंद्रभाऊ भोसले सचिव सोमनाथभाऊ देवकाते आलवसा फाउंडेशन चे संघटक नितिनभाऊ कसबे शिष्ट मंडळ उपस्तिथ होते.