इतकी वर्ष महाराष्ट्रात राहिल्यानंतरही अविश्वास, सुप्रीम कोर्टानं Parambir Singh यांची याचिका फेटाळली

0
23

सर्वोच्च न्यायालयाने आज (11 जून) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळताना, “जिनके घर कांच के हों, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंकते” (People In Glass House Should Not Throw Stones) असे ताशेरे ओढले. परमबीर सिंह हे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत, त्यांनी जवळपास 30 वर्षे राज्यातील पोलीस दलात काम केलं आहे, असं असतानाही आता ते राज्याच्या पोलीस दलावर किंवा तिथल्या प्रशासनाच्या चौकशीवर विश्वास नाही, असा पवित्रा कसा घेऊ शकतात असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्यात आपल्याविरुद्ध सुरु असलेले खटले राज्याबाहेर चालवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळताना, ‘People In Glass House Should Not Throw Stones’ असा शेरा मारत सुनावणीस नकार दिला.

Source link