ऐकावे ते नवल! लसीकरणानंतर शरीरावर चिटकू लागले स्टील आणि लोखंड; पाहा व्हिडिओ

0
20

नाशिकः (प्रतिनिधी) । शासननामा न्यूज ऑनलाईन

करोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर शरीरावर लोखंड व स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा अजब दावा करण्यात आला आहे. अरविंद सोनार यांनी हा दावा केला असून करोनावरील लस घेतल्यापासून या वस्तू शरीरावर चिटकत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

सिडको परिसरात राहणारे अरविंद सोनार यांनी ९ मार्च रोजी करोनावरील लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर २ जून रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर त्यांच्या शरीराला अचानक वस्तू चिटकायला लागल्या आहेत. लस घेतल्यानंतर चुंबकत्व निर्माण होते. याबाबत एक व्हिडिओ त्यांच्या मुलानं समाजमाध्यामावर पाहिला. त्यांनंतर त्यांनीहीघरी हा प्रयोग करुन पाहिला. आश्चर्य म्हणजे त्यांच्या शरीरावर स्टील, लोखंडाच्या वस्तू चिटकल्या.

दरम्यान, पालिकेच्या आरोग्य विभागानं या प्रकाराची तातडीने दखल घेतली आहे. आज सकाळी आरोग्य विभागाचं एक पथक सोनार यांच्या घरी पोहोचले आहेत. अरविंद सोनार यांची तपासणी केली जात असून नेमका काय प्रकार आहे याची पाहणी केली जात आहे. लसीचा हा परिणाम नाहीये, असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

लोकांनी वैज्ञानिक सत्यता स्पष्ट झाल्याशिवाय कोणाती लसीकरणाबाबत गैरसमज करुन घेऊ नये, असं आवाहन पालिकेच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी केलं आहे. आतापर्यंत साडेतीन लाखांहून जास्त लोकांना लस देण्यात आली असून इतर व्याधीमुळं हा प्रकार घडत असल्याची शक्यता कमी आहे, असंही पालिकेच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडिओः

लसीचे दोन डोस घेतल्यानंतर शरीरात निर्माण झालं चुंबकत्व?

Source link