Sunday, July 25, 2021
Homeमहाराष्ट्रajit pawar on covid third wave: Ajit Pawar: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका;...

ajit pawar on covid third wave: Ajit Pawar: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; अजित पवारांनी केल्या ‘या’ सूचना – ajit pawar alerted the administration about the third wave of covid


हायलाइट्स:

  • करोना संसर्गाच्या संकटाने समाजाला आरोग्यभान दिले.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महत्त्वाचे विधान.
  • संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत प्रशासनाला केले सतर्क.

नाशिक:करोना विषाणूच्या संकटाला सामोरे जाताना आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातून आरोग्याची काळजी घेण्याचे भान करोनामुळे आपणास आले आहे, असे नमूद करताना करोनाच्या संकटाला सामोरे जावून त्यावर मात करण्यात प्रशासनाच्या पाठिशी राज्य शासन भक्कमपणे उभे राहिले आहे आणि यापुढेही राहील, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिला. ( Ajit Pawar On Covid Third Wave )

वाचा: दोन डोस घेतले त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या; सत्तेतील ‘या’ पक्षाची मागणी

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करोना सद्यस्थिती व उपाययोजना तसेच खरीप हंगाम आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ तसे अन्य प्रमुख पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. अजित पवार पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणावर भर देणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या नियमित उपस्थितीवर लक्ष केंद्रीत करून दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी रुग्णवाहिकांची व्यवस्था होईल, याचे नियोजन करण्यात यावे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य व पोलीस विभागांनी मनुष्यबळ उपलब्धतेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. करोनाचा हा काळ अतिशय बिकट असल्याने ग्रामीण भागात सेवा देताना मानवतेच्या भावनेतून शासकीय डॉक्टरांनी काम करावे.

वाचा: मराठा आरक्षणाच्या प्रयत्नांना धक्का; केंद्राची फेरविचार याचिका फेटाळली

करोनाच्या पहिल्या लाटेत ६० पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. दुसऱ्या लाटेत ३० ते ६० वयोगटातील अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासर्व परिस्थितीचा विचार करता संभाव्य तिसऱ्या लाटेत ३०च्या आतील वयोगटातील नागरिक तसेच बालके बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यादृष्टीने प्रत्येक तालुकास्तरावर बालरोगतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांवर पोलीस विभागाने कडक कारवाई करावी, अशा सूचनाही यावेळी अजित पवार यांनी दिल्या.

करोना काळात सर्वांचे काम कौतुकास्पद: छगन भुजबळ

करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली तरी सध्या रुग्णसंख्या २५०० वर स्थिर असल्याने अजूनही आपली चिंता पूर्णपणे दूर झालेली नाही. त्यामुळे सर्वांनीच याकाळात काळजी घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या लाटेच्या काळात जिल्हास्तरावर ऑक्सिजन निर्मिती, बेडस् उपलब्धता, प्रयोगशाळांची निर्मिती अशा अनेक कायमस्वरूपी आरोग्य सुविधांची निर्मिती करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. यासाठी सर्वांनी घेतलेली मेहनत ही कौतुकास्तपद असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

वाचा: करोना: राज्यात आज ९ हजार १९५ नवे रुग्ण; रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवरSource link

ajit pawar on covid third wave: Ajit Pawar: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; अजित पवारांनी केल्या 'या' सूचना - ajit pawar alerted the administration about the third wave of covid
Shasannama Newshttps://shasannama.in
Shasannama is the digital wing of the Shasannama News - Maharashtra leading media and communications group with its interests spanning across Print, Activations, Radio and Digital. Shasannama.com is the News and Current Affairs portal of the company, covering news from the states of Maharashtra
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent News