शेतकऱ्याच्या ६ वर्षीय मुलीला दुर्मिळ आजाराने ग्रासलं; उपचारासाठी कुटुंबाकडून मदतीचं आवाहन

0
37

अकोला: (वृत्तसंस्था) । शासननामा न्यूज ऑनलाईन 

बाळापूर तालुक्यातील पारस येथील अल्पभूधारक शेतकरी असलेले सुनील सुभाषराव लांडे यांच्या ६ वर्षाच्या मुलीला थँलेसिमिया या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. तिच्यावर होणाऱ्या बोन मॅरो या शस्त्रक्रियेसाठी १५ लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र ६ वर्षाच्या चिमुकलीच्या उपचारासाठी तिच्या आई वडिलांकडे एवढे पैसे नाहीत. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचं आवाहन समृद्धीच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आलं आहे.

पारस येथील सुनील लांडे हे अल्पभूधारक शेतकरी असून आपल्या शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली असून त्यापैकी मोठी मुलगी समृद्धी हिला थँलेसिमिया आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार तिला अहमदाबाद येथील सिम्स हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, यासाठी तिच्यावर बोनमॅरो ही महागडी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून १५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ६ वर्षाची समृद्धी या आजाराशी झुंज देत असून यातून तिला बाहेर काढण्यासाठी संवेदनशील व्यक्तींनी समोर येण्याची गरज आहे.

कुठे करू शकाल मदत?

मदतीसाठी आपण सुनील सुभाषराव लांडे यांच्या गुगल पे किंवा फोन पे नं 9405359147 तसेच एसबीआय अकाऊंट नं पारस शाखा 30935308601, आयएफएससी कोड – एसबीआयएन 0003612 यावर सढळ हाताने मदत करू शकता.

मदतीसाठी सरसावले हात; व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे मदतीचा ओघ सुरू

उपचाराचा खर्च १५ लाख असल्याने समाजातील जागृत व सेवाभावी व्यक्तींनी रविवार ता.६ जून पासून व्हॉट्सअ‍ॅपवर हेल्प फॉर समृद्धी असा मदतीचा ग्रुप सुरू करून मदतीचे कॅम्पेन चालवले आहे. गत २४ तासात दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला असून आणखी मदतीची गरज असल्याने इतरांनीही मदतीसाठी पुढे यावं, असं आवाहन कुटुंबाने केलं आहे.

Source link